Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

राजधानी पणजीसह गोव्यात 'मुसळधार'; गोवेकरांची दाणादाण

मुसळधार पावसाने पणजीत पाणी तुंबलं; गोमेकॉ परिसरातही वाहतूक कोंडी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत असून आज सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे राजधानी पणजीत पुन्हा एकदा पाणी तुंबलं असून ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आहे. (Heavy Rain in Goa News Update)

मुसळधार पावसाने राजधानी पणजीसह आसपासच्या परिपरातही दाणादाण उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य गोवेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला पोहोचण्यात अडचणी येत आहेत, तर कामावर जाणारेही पावसामुळे खोळंबले आहेत. पणजीसह बांबोळी, मिरामार परिसरात पाणी भरल्याने गोवा विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, तसंच गोमेकॉमध्ये जाणारे रुग्ण यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रविवारी रात्रीपासूनच गोव्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पणजी मार्केटमध्ये पाणी साचल्यामुळे विक्रेत्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. तर मिरामार सर्कलकडे पाणी साचल्याने वाहतूक खोळंबल्याचं चित्र होतं. दुसरीकडे बांबोळी परिसरात गोमेकॉजवळील सबवे पाण्याने भरल्याने पाणी रस्त्यावर आलं आणि मडगाव-वास्कोच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली. पाऊस असाच सुरु राहिला तर अन्य सखल भागांमध्येही पाणी भरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पणजीसह म्हापसा, सत्तरी, पेडणे, मडगाव, फोंडा, काणकोण परिसरातही तुफान पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT