Heavy Rain in Panjim Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद

पुढील चार दिवस गोव्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी गेल्या 24 तासांत या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75.6 मिलिमीटर पाऊस झाला असून शुक्रवारीही सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासह पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने कालही जोरदार बॅटींग केल्याने एका दिवसात 60 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सखल भागांबरोबर रस्त्यावर पाणी साठल्याने पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे.

काल गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरवात केली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत उसंत न घेता तो कोसळत राहिला. हवामान खात्याच्या वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जाहीर केला केला असून, रात्री उशिरापर्यंत पाऊस असाच पडत राहिल्यास पणजी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने दिली आहे.

दुसरीकडे पावसाने म्हापसा शहरासह बार्देश तालुक्याला गुरुवारी दिवसभर झोडपून काढले. परिणामी, संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळ आणि नाले हे दुथडी भरुन वाहू लागले. त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिवाय सकाळी तासभर कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे खोर्ली-म्हापसा येथील उसपकर हॉटेलच्या समोरील जंक्शनवर सुमारे दोन फुट उंच इतका पाण्याचा स्त्रोत रस्त्यावरुन वाहू लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT