Heavy Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत जोरदार पाऊस पडल्यानं दाणादाण

रस्त्यावर साचले पाणी, शेतकऱ्यांना मात्र पावसामुळे दिलासा

दैनिक गोमन्तक

डिचोली : काही दिवसांपासून कारवारच्या आसपास रखडलेला मॉन्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी डिचोलीत बहूतेक सर्वच भागात पर्जन्यवृष्टी झाली. गेले दोन दिवस काही प्रमाणात पाऊस बरसला होता. मात्र शुक्रवारी सकाळीच पावसाने जोर धरला. सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. पण शेतीची कामे सुरू झाली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

डिचोली परसिरात दुपारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. सायंकाळी पाऊस पुन्हा ओसरला, मात्र उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती. पावसामुळे रस्त्याच्या बाजूने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थी तसेच घराबाहेर पडलेल्या प्रत्येकाला छत्र्या पेटवून आणि रेनकोट घालूनच बाहेर पडावे लागले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पाऊस सक्रिय झाल्याने आता बळीराजालाही शेतजमीन मशागतीच्या तयारीची लगबग लागणार आहे.

पावसात सकाळी वाठादेव येथे झांट्ये महाविद्यालयाजवळ एक वडाचे झाड रस्त्यावर कोसळले. या पडझडीत मोठीशी हानी झाली नाही. सायंकाळपर्यंत कोणतीही पडझड झाली नाही. अशी माहिती डिचोली अग्निशामक दलाकडून मिळाली. मात्र या पावसामुळे डिचोली शहरासह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

VIDEO: निरीक्षक नाईक पुन्हा कोलव्यात, ग्रामस्थ संतप्त; आमदार व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT