Fire In Home  Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News : वाळपईत घराला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान

वाळपई अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळविले नियंत्रण

पद्माकर केळकर

वाळपई-सय्यद नगर येथे घराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री सय्यद नगर येथील शेतकी विभागीय कार्यालयाजवळील परिसरात घडली. या आगीत घराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकी विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या उस्मान फतिफ यांच्या घराला काल रात्री एकच्या दरम्यान आग लागली. घटनेची माहीती मिळताच वाळपई अग्नीशमन दलाचे साहाय्यक अधिकारी अनंत गावस, बाबूराव गावस, डीपीटी. अमोल चोर्लेकर, फायर फायटर कालिदास गावकर आदींनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यासाठी पाण्याचा एक बंब वापरण्यात आला. आगीत सुमारे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राज्यात अशीच एक आगीची घटना समोर आली आहे. मात्र ती आग कारला लागली आहे. आज सकाळी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक टाटा इंडिका गाडीने पेट घेतला. आगीत ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन पार्क केल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासोबतच इतरांनाही आगीच्या धोक्यापासून वाचवलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT