Margao Fish Market Dainik Gomantak
गोवा

मडगावच्या घाऊक मासळी बाजाराला जत्रेचे रुप

दररोज येथे 20 ते 25 मोठे ट्रक व जवळ जवळ 150 ते 200 जीप गाड्या मासळी घेऊन रात्रीच्या वेळी येतात व पहाटे 4 वाजल्यापासून विक्रीला सुरुवात होते.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगावच्या (Margao) एसजीपीडीएच्या घाऊक मासळी बाजाराला सकाळच्या वेळेत जत्रेचे रुप असते. घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, त्यांचे एजंट, मासळीच्या (Fish) टोपल्या डोक्यावरुन नेणाऱ्या बाई, वाहनांचे चालक व स्थानिक लोक मिळुन कमीत कमी  4 ते 5 हजार लोक तेथे जमलेले असतात. आज या प्रतिनिधिने या मासळी बाजाराची पाहणी केली व तेथे होत असलेल्या गर्दीचा व वातावरणाचा अनुभव घेतला. येथे मासळी आंध्र प्रदेश, केरळ, रत्नागिरी, कारवार या भागातून येते असे एका घाऊक विक्रेत्याने या प्रतिनिधिला सांगितले. दररोज येथे 20 ते 25 मोठे ट्रक व जवळ जवळ 150 ते 200 जीप गाड्या मासळी घेऊन रात्रीच्या वेळी येतात व पहाटे 4 वाजल्यापासुन विक्रिला सुरुवात होते. असे तो म्हणाला.

पहाटे 3.30 वाजल्यापासुन दुचाकी व चार चाकी वाहनांची तसेच सायकलवरुन मासळी विकणारे शेकडो लोकांची वर्दळ  सुरु होते. येथे किरकोळ मासळी विकता येत नाही. कमीत कमी एक तरी किलो मासळी घ्यावीच लागते असे आणखी एका विक्रेत्यांने सांगितले. मात्र येथे स्थानिक रापणकार व ट्रॉलरवरुन येणाऱ्या मासळीचा अभाव दिसतो. सर्व मासळी बर्फामध्येच ठेवलेली असते. पूर्वी येथे भाजीविक्री सुद्धा होत होती. पण आता त्यांना तसेच इतर विक्रेत्यांना तेथुन हटविण्यात आले असुन केवळ काही बायका सुकी मासळी विकायला बसतात. तरी सुद्धा या घाऊक मासळी बाजारामुळे दोन ते अडीच हजार लोकांचा पोटा पाण्याच प्रश्र्न सुटतो. या मध्ये मोटरसायकल पायलट, चहा नाश्ता पुरविणाऱ्यांचा समान येथे पहाटेपासुन डोक्यावरुन मासळीच्या टोपल्या नेणाऱ्या शेक़डो बायका काम करतात. 

आपल्याला दिवसाला कमीत कमी 400 ते 500 रुपये या कामामुळे मिळतात असे एका बाईने या प्रतिनिधिला सांगितले. शिवाय गावा गावांमध्ये जाऊन दारोदारी मासळी विकणारे शेकडो विक्रेते येतात. एका विक्रेत्याने सांगितले की आपल्याला  दररोज 600 ते 700 रुपयांचा फायदा होतो. दररोज येथे कमीत कमी 200 टन मासळी येते. मात्र गेल्या काही दिवसांपासुन यामध्ये घट झाल्याचे एका घाऊक विक्रेत्याने सांगितले. सद्या आपल्या मताप्रमाणे येथे दररोज 1.5 ते 2 कोटी रुपयांची उलाढाल होते असे आणखी एका घाऊक  विक्रेत्याने सांगितले. पहाटे 4 ते 9 पर्यंत येथे 150 पेक्षा जास्त घाऊक मासळी विक्रेते कार्यरत असतात. 

आज बांगडे, तारले, मुड्डशा, कोळंबी, चणक ही मासळी जास्त प्रमाणात होती व त्याची किंमत 200 ते 300 रुपये किलो अशा भावात होत होती.या सर्व वातावरणामध्ये सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला दिसतो. तसेच जास्तीत जास्त लोकांच्या तोंडाला मास्कच नसते. 

एका किरकोळ गिऱ्हाईकाने सांगितले की या बाजारात येण्यास थोडी भितीच वाटते. येथे केरळ मधुन मासळी येते. तेथील वाहनांचे ड्रायव्हर व इतर कामगार दररोज येत असतात. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे या लोकांपासुन कोरोनाची भिती आहे असे तो म्हणाला. सरकारने या गोष्टीकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे असे त्याने सुचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT