Goa: वाळपईतून 90 महिला सुरक्षा रक्षक लोक सेवेत दाखल

वनप्रशिक्षण मैदानावर उपस्थित दिक्षांत सोहळ्यात 90 महिला सुरक्षा रक्षकांच्या तुकडी सोबत कार्यकारी संचालक नारायण नावती, आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर व इतर.
90 women security guards recruited from Walpai, Goa
90 women security guards recruited from Walpai, GoaDainik Gomantak

एकीकडे पावसाची (Rain) रिमझिम व त्यामुळे मैदानावर तयार झालेला चिखलमय घसरण व अशातच महिला सुरक्षा रक्षकांनी केलेली पासिंग परेड डोळ्याचे पारणे फेडणारी होती. वाळपईच्या (walpai) वनप्रशिक्षण मैदानावर पावसामुळे मोठी चिखलमय परिस्थिती होती. त्यातच विशेष करुन 90 महिला सुरक्षा रक्षकांनी दिक्षांत सोहळ्यात आपले कलाकौशल्य समर्थपणे पेलले आहे. अगदी तनमनधन पुर्वक पावसाची पर्वा न करता सोहळ्यात रंगत आणली होती.

गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे चौथ्या सुरक्षा रक्षक तुकडीसाठी वीस दिवसांचे प्रशिक्षण वाळपई वनप्रशिक्षण केंद्रात घेण्यात आले होते. पहिल्या तीन तुकड्या पुरुषांसाठी घेण्यात आली होती. व आता चौथी पण महिलांची पहिली तुकडी आज लोकसेवत दाखल झाली आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक नारायण नावती, वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डाँ. श्याम काणकोणकर आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला महिला सुरक्षा रक्षकांनी मान्यवरांना सेल्यूड करुन सन्मान दिला. त्यानंतर पाहुणे श्री. नारायण नावती यांनी तुकडीची पहाणी केली. तसेच महिलांनी संचलन करुन मानवंदना दिली. सभागृहात प्रकट कार्यक्रमात नारायण नावती म्हणाले कोवीडच्या काळात जास्त रोजगार देणारे आमचे पहिले महामंडळ बनले आहे. आता पर्यंत दीड हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे.

चरितार्थ चालविण्यासाठी चार तुकड्या करुन नोकर्या दिल्या आहेत. सद्या पाऊस असल्याने नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नवीन तुकड्या केल्या जातील. रोजगारा बरोबरच सुविधा पुरविल्या जात आहेत. सुरक्षा रक्षकं हाऊस किपिंग, व आता मल्टिट्रास्टिंग, शिपाई, चालक अशा माध्यमातून नियुक्त केले जाते. जवळपास 168 एमटीएस म्हणून नियुक्त केले आहेत. नवीन इमारतीत हाऊस किपींग एडेंडेट म्हणून साडेसहाशे नियुक्त केले असून आणखीन दीडशेजण नियुक्त केले जातील. चक्क मिलिटरी पध्दतीने प्रशिक्षण दिले आहे.

90 women security guards recruited from Walpai, Goa
पत्रादेवी नाक्यावरून येणारे सर्वच प्रवासी कोरोना नकारात्मक कसे ?

बांबोळी महाविद्यालयात सुरक्षा रक्षकांचे काम अगदी कौतुकास्पद असून लोकांच्या मौल्यवान वस्तूही सुरक्षा रक्षकांनी लोकांना सुपुर्द केल्या आहेत. कमी पगारात देखील निस्वार्थी भावनेने रक्षक काम करीत आहेत. याआधी प्रशिक्षणासाठी अन्य एजंसीना खर्च द्यावा लागत होता. तो एक कोटीहून अधिक होत होता. पण यावेळी मिलेटरी बँकग्राऊंड विभागामार्फत घरच्या घरीच प्रशिक्षण दिल्याने खर्चही मोठा वाचला आहे. चार तुकडींसाठी सात ते आठ लाख रुपये खर्च वाचवल्याने सरकारचे 90 लाख रुपये वाचविले आहेत असे नावती म्हणाले. डाँ. श्याम काणकोणकर यांनी महिला सुरक्षा रक्षकांना कार्यासाठी शुभेच्छ्या दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com