Goa Heat Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Heat Alert: दुपारी घराबाहेर पडू नका; गोव्यात पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार

Goa Temperature Rise: राज्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीनंतर आता पुन्हा उष्म्याचा तडाखा वाढू लागला आहे. पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून आर्द्रतेमुळे अधिक प्रमाणात उष्मा जाणवण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीनंतर आता पुन्हा उष्म्याचा तडाखा वाढू लागला आहे. पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून आर्द्रतेमुळे अधिक प्रमाणात उष्मा जाणवण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (14 एप्रिल) पणजी (Panaji) येथे कमाल ३४.२ तर किमान २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कमाल तापमानात सरासरी तापमानाच्या तुलनेत ०.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. कमाल आर्द्रता ही ८२ टक्के इतकी नोंदविली.

पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नागरिक उष्म्यापासून बचावासाठी दुपारी नदी, ओहळ, तळे, बंधाऱ्यांवर जात डुबकी मारत आहेत. शहाळे, लिंबू पाणी तसेच इतर शीतपेयांना देखील मागणी वाढली आहे.

त्रास जाणवल्यास तपासणी करा...

सततच्या हवामान बदलांमुळे राज्यात दमट वातावरण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची (Health) योग्य ती काळजी घ्यावी.

तसेच मुले व ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये. तेलकट, मसालेदार पदार्थ, चहा, कॉपी, मद्यपान अतिप्रमाणात करू नये. उष्म्याचा त्रास जाणवल्यास इस्पितळात तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT