Heat Related Health Problems  Dainik Gomantak
गोवा

Heat Related Health Problem: राज्‍यात उष्माघातामुळे वाढले विविध आजार; अंगाची लाहीलाही

Heat Related Health Problems : डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा, चक्कर येण्‍याचे प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Related Health Problems

राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. आर्द्रता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून अनेक नागरिकांना या उष्माघाताचा त्रास होत आहे.

डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा, चक्कर येणे आदी प्रकार दिसून येत असल्याने प्रत्‍येकाने आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

राज्यात एप्रिलपेक्षा मे महिन्‍यात उष्मा वाढतो. त्‍यामुळे येत्या काळात यापेक्षा अधिक उष्मा असणार आहे. वाढत्या उष्म्याबाब आरोग संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, राज्यातील आरोग्यकेंद्रात विविध कारणांसाठी नागरिक उपचारांसाठी येतात.

कोणीही रुग्ण हा वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय म्हणून येत नाही. कोणाचे डोके दुखते किंवा इतर कारणे असतात. ज्यावेळी निदान केले जाते त्यावेळी उष्म्यामुळे त्रास झाला असेल तर त्यावर त्या पद्धतीने उपचार केले जातात.

उष्माघाताचा परिणाम प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्गावर दिसून येतो. त्यामुळे राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांमध्ये एक बेड उष्माघाताच्या रुग्णासाठी राखीव ठेवला जातो. सोबत औषधे, ओआरएस तसेच इतर काळजी घेतली जाते. नागरिकांच्या माहितीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन सूचना जारी केल्या जातात.

- डॉ. प्रशांत सूर्यवंशी, नोडल अधिकारी (आरोग संचालनालय)

कोणती खबरदारी घ्‍यावी?

योग्य व संतुलित आहार घ्‍यावा.

भरपूर पाणी प्यावे.

दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये.

सैल, कॉटन कपडे परिधान करावेत.

सदा पाण्याची बाटली सोबत ठेवणे.

उन्हात गेल्‍यास टोपी वापरणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa State Film Festival: सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान! CM सावंतांचे प्रतिपादन; राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून आणले गोव्यात, विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; 18 वर्षाच्या तरुणाला अटक

Droupadi Murmu: 'ऑपरेशन सिंदूर इतिहासात नोंदवले जाईल'! राष्ट्रपती मुर्मूंचे गौरवोद्गार; अर्थव्यवस्थेची सक्षमता केली अधोरेखित

Horoscope: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! थोडी सावधगिरी बाळगा, जोखीम टाळा

Goa Coconut Price: नारळ महागले! सरकारचे मोठे पाऊल; मिळणार 'इतक्या' दराने, Watch Video

SCROLL FOR NEXT