Heat Wave in Goa
Heat Wave in Goa Dainik Gomanta
गोवा

गोव्यात मेपर्यंत उच्चांकी तापमान, हवामान खात्याचा अंदाज

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच पावसाच्या अवकाळी हजेरीने गोवेकर आधीच त्रस्त आहेत. मात्र आता गोवेकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी आहे. गोव्याला येत्या काही दिवसांमध्ये उच्चांकी तापमानाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च ते मे 2022 या काळात गोव्यात (Goa) कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानही नेहमीच्या तापमानापेक्षा जास्तच राहणार आहे. याचा फटका उन्हाळी पिकांना बसण्याची शक्यता आहे. मार्चअखेरीस वाढलेल्या तापमानामुळे गोव्यात काहिली होताना दिसते आहे. आणखी तापमानात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवल्याने गोवेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पारा झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. सकाळपासूनच तापमानात (Temparature) वाढ झाली असून दमटपणाही जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागात तापमानात वाढ होऊ शकते. IMD ने सौराष्ट्र-कच्छी, गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे गोव्याच्या काही भागात मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD) व्यक्त केली आहे. याच काळात राज्यातील विविध भागात पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. तो खराही ठरला. 23 मार्च रोजी राज्यातील विविध भागात पावसाच्या सरी बरसल्या. म्हापसा येथे 2 मि.मी. तर सर्वाधिक पाऊस वाळपई व साखळी येथे अनुक्रमे 17 व 18 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

Actor Srikanth: अभिनेता श्रीकांत फॅमिलीसोबत गोव्यात करतोय सुट्ट्या एन्जॉय; फोटो व्हायरल!

Loksabha Voting Panaji : पणजीत मतदान कमी का झाले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनियोजित कामामुळे पणजीकर नाखुश

Sasashti News : ‘ख्रिश्‍चन’ विवाहासाठी वेळ वाढवा; चर्चिल यांची मागणी

SCROLL FOR NEXT