Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification : अपात्रता प्रकरणी आठ आमदारांबाबत 24 रोजी सुनावणी

आजी-माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वेगवेगळ्या याचिका

दैनिक गोमन्तक डिजिटल

काँग्रेसच्या आजी - माजी प्रदेशाध्यक्षांनी वेगवेगळ्या आमदार अपात्रता याचिका सादर केल्या आहोत. एकाच मुद्द्यावर बहुयाचिका सादर करणे योग्य नाही. त्यांच्या याचिकेच्या आधी सादर झालेल्या इतर याचिकांवरील सुनावणी सुरू आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची याचिका सुनावणीसाठी घेण्याबाबत वेळमर्यादाचे बंधन घालण्यात येऊ नये, असे उत्तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या आठ फुटीर आमदारांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केले आहे. ही याचिका अंतिम सुनावणीसाठी येत्या 24 मार्चला ठेवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी 30 दिवसांत पूर्ण करणे गरजेचे आहे. याचिकादारा गिरीश चोडणकर यांनी आमदार अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केली आहे.

मात्र चार महिने उलटून गेले तरी अजून प्रतिवादी असलेल्या आमदारांना नोटीसही बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ती 30 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने द्यावेत यापुरतीच ही याचिका मर्यादित आहे.

सुनावणीला आधीच उशीर झालेला आहे त्यासाठी ती लवकरात घेऊन ती पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे अशी बाजू याचिकादाराचे वकील अभिजीत गोसावी यांनी मांडली. मागील सुनावणीवेळी सभापतींनी नोटिशीला उत्तर दिले होते, तर त्या फुटीर आठ आमदारांनी उत्तर सादर करण्यासाठी आजपर्यंत मुदत वाढवून घेतली होती.

त्यानुसार आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, रुदॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा व संकल्प आमोणकर यांनी वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे सादर केली असली तरी दिलेल्या स्पष्टीकरणात साम्य आहे.

सभापतींकडेही प्रकरण!

सभापतींसमोर आमदार अपात्रताप्रकरणाची अनेक प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित असून त्यावरील सुनावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सभापतींना गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवरील सुनावणी निश्‍चित वेळेत पूर्ण करण्याचा निर्देश दिल्यास तो अन्यायकारक ठरणार आहे. याचिकादाराची याचिका सभापतींसमोर रांगेत आहे. त्यापूर्वीच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT