Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College : वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणावर उद्या सुनावणी

खंडपीठाने सरकारला दिलेल्या नोटिशीचे उत्तर तयार नसल्याने सरकारकडून वेळ मागण्यात आली होती

दैनिक गोमन्तक

Goa Medical College Reservation Petition : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण ठेवण्याच्या गोवा सरकारच्या अधिसूचनेला वैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी येत्या बुधवारपर्यंत (9 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तहकूब केली.

खंडपीठाने सरकारला दिलेल्या नोटिशीचे उत्तर तयार नसल्याने सरकारकडून वेळ मागण्यात आली होती.

मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली होती, त्यावरील सुनावणी आज ठेवली होती. वैद्यकीय पदवीधर विद्यार्थी मोहनिश अरुण सरदेसाई याच्यासह ६८ विद्यार्थ्यांनी ही आव्हान याचिका सादर केली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण ठेवण्याचा सरकारने ५ मे २०२३ रोजी घेतलेला निर्णय हा सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्याची अंमलबजावणी केल्याने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणे मुश्कील होणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय पूर्ण अभ्यासाअंती नाही.

या अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्यासाठी समाजकल्याण खात्याने रोस्टर तयार केलेला नाही. या अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षणासाठी ठेवल्यास सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, याची भीती आहे. याचिकादारांना पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने ते या आरक्षणामुळे वंचित होण्याची शक्यता आहे.

अधिसूचना काढताना आवश्यक असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी १२१ पैकी ६१ जागा उपलब्ध आहेत. आरक्षण दिल्यास ६१ पैकी फक्त ३४ जागा सर्वसाधारण गटासाठी उपलब्ध होणार आहे. हा अन्याय असल्याचा दावा याचिकेत मांडण्यात आली आहे.

निर्णयाला स्थगिती द्या!

आरोग्य खात्याने ५ मे २०२३ रोजी निर्णय घेऊन ११ मे २०२३ रोजी जारी केलेली अधिसूचना रद्दबातल ठरवावी. तज्ज्ञ समितीने हा निर्णय घेण्यासाठी केलेली प्रक्रियेचा दस्तावेज मागवून घ्यावा व त्याची तपासणी करून केलेली शिफारस रद्द करावी.

याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ५ मे २०२३ रोजी घेतलेला निर्णयाला खंडपीठाने स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT