Healthy Vegetables  Dainik Gomantak
गोवा

Healthy Vegetables : नैसर्गिक रुचकर भाज्यांची मेजवानी; औषधी गुणांमुळे दैनंदिन जीवनात वापर

गोमन्तक डिजिटल टीम

पद्माकर केळकर

सध्या पाऊस जोमाने पडू लागला असून ग्रामीण भागात नैसर्गिकपणे उगवलेल्या रानभाज्यांना बहर आला आहे. कोणतेही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातील चवदार भोजनाची मेजवानीच! या भाज्या चवीला रुचकर असतातच, शिवाय त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात.

हल्ली या भाज्यांचे महत्त्व ओळखून बाजारात देखील त्या सहज उपलब्ध होतात. सत्तरी तालुक्यात टाळकुळा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवते. मेथीच्या भाजीप्रमाणे दिसणारी कोवळी रोपे भाजीसाठी वापरली जातात. टाळकुळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगांसाठी औषधी म्हणून वापरली जाते.

जीवनसत्त्वांचा खजिना

दिंडा या वनस्पतीला पावसाळ्यात कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिचे कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी चविष्ट असते. शेवळा ही वनस्पती म्हणजे सुरणाच्या फुलांची दांडी. भाजीसाठी संपूर्ण फुलोऱ्याची दांडीच वापरतात. यात प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते.

भाजी आणि त्यांचे औषधी गुणधर्म

  • टाळकुळा : ही भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात, कफ कमी होतो.

  • कुरडू : दमेकरी, जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यांसाठी उपयुक्त आहे. याने लघवी साफ होते. कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत.

  • कुड्याच्या शेंगा : रोजच्या जेवणात चटणीसाठी वापरल्या जातात.

  • कर्टोली : हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

  • कपाळफोडी : पोट गच्च होणे, मलाविरोधसारख्या विकारात आराम मिळतो. मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. जुनाट खोकल्यावर ही भाजी उपयुक्त आहे.

चवदार भाज्यांचा सर्रास वापर

कातने, हजार मूट, घोटशेरो, गुळवेल, गोयाटा, तेरे, बोणकाळो, पांढरा कुडा, कपाल फोडी, कुरडू, साळकाणो, सुरण, आघाडा, हरफूल, केना, पोपटा, भारंगी, रानमेथी, गुळवेल, घोटवेल, टेटू, दिणो, रानकर्मल अशा बऱ्याच नैसर्गिक भाज्यांचा वापर सत्तरीतील लोक सध्या करू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT