Salcete Dainik Gomantak
गोवा

Salcete: नागरिकांच्या जीवाशी खेळ; मासळी धुण्यासाठी गटाराच्या पाण्याचा उपयोग, आरोग्य यंत्रणा कुठंय?

Goa health Risk: भाजी विक्रेते तेथील गटारातील पाणी काढून भाजी धुण्याचे प्रकार उघडकीस आले होते, आता तर मासळी विक्रेते सुद्धा याच दुर्गंधी युक्त पाण्याने मासळी धुताना दिसत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: आके पावर हाऊसजवळ व तेथील वाहतूक सर्कल परिसरात फळ, भाजी विक्रेत्यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले असून आता मासळी विक्रेते सुद्धा येऊन बसायला लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजी विक्रेते तेथील गटारातील पाणी काढून भाजी धुण्याचे प्रकार उघडकीस आले होते, आता तर मासळी विक्रेते सुद्धा याच दुर्गंधी युक्त पाण्याने मासळी धुताना दिसत आहेत.

ज्या लोकांनी हा प्रकार पाहिला आहे, त्यांनी तेथे फळे, भाजी व मासळी विकत घेणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. हा प्रकार सरपंच साईश राजाध्यक्ष यांच्या लक्षात आणून देण्यात आला आहे.

आपण त्यांच्यावर त्वरित कारवाई करू, असे आश्वासन सरपंचांनी दिले आहे. गटारातील पाण्याने मासळी धूत असलेला व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT