Minister Vishwajit Rane And Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: 'सरकारमध्ये अर्धे लोक काँग्रेसचेच, पुढच्यावेळीही तुम्हीच मदत करणार'; मंत्री राणेंचा LOP आलेमाव यांना खोचक टोला

Goa Assembly Session 2025: जिल्हा रुग्णालयाचे काम ज्या पद्धतीने सुरु आहे तुम्ही त्याचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवणार का? असा खोचक सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.

Pramod Yadav

Goa Assembly Session 2025

पर्वरी: गोव्यातील आरोग्य विभाग आणि रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील रुग्णलयांच्या विविध कमतरतांवर बोट ठेवले. प्राथमिक स्तरावरील रुग्णालयांतून आवश्यक वैद्यकीय साधनांची कमतरता असल्याने रेफर करण्याचे प्रमाण वाढल्याचे आलेमाव म्हणाले. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत उत्तर देताना आलेमाव यांनी खोचक टोले लगावले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुन्य प्रहरात राज्यात गेल्या पाच वर्षात विविध ठिकाणांवरुन १, ८०, २५६ रेफरल करण्याता आल्याचे सांगितले. तसेच, पाच वर्षात झालेल्या १५,८४२ अपघातात ९०० लोकांनी जीव गमावल्याचे नमूद केले. राज्यातील रुग्णालयांत सुविधांचा अभाव असल्याने लोक मरत असल्याचे ते म्हणाले. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे काम ज्या पद्धतीने सुरु आहे तुम्ही त्याचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवणार का? असा खोचक सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.

'मी गोव्यात सर्वाधिक काळ आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय योग्य पद्धतीने चालावे यासाठी सरकार काम करत आहे. रिक्त डॉक्टरांच्या जागा भरल्या जात आहेत. इंडियन हेल्थ स्टँडर्सच्या पुढे जाऊन आम्ही करतोय. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही. आम्ही येऊन नाव बदलू असे तुम्ही म्हणताय पण आम्ही एवढ्या लवकर काही येथून जाणार नाही', असं टोमणा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी उपस्थित केला.

'सरकारमध्ये अर्धे लोक तुमचेच आहेत. पुढच्यावेळीही राज्यात भाजपचेच सरकार येणार आणि ते आणण्यासाठी तुम्हीच मदत करणार', असा टोला मंत्री राणे यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.

राज्यातील रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. २०२२ पासून फोंडा आणि म्हापसा येथे सी. टी स्कॅन मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. एम आर मशीनची देखील खरेदी अद्याप सुरुच आहे. दक्षिण जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने इतर डॉक्टरांवर अनावश्यक दबाव निर्माण होत आहे. खासगी रुग्णालयासाठी हा अट्टाहास सुरु आहे का? आम्ही त्याला कडाडून विरोध करु? असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

यावर बोलताना मंत्री राणे यांनी आवश्यक वैद्यकीय मशीन खरेदी आणि कर्मचाऱ्यांची भरती सुरु असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT