Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: पुरग्रस्तांना आरोग्यमंत्री राणेंचा मदीतीचा हात

कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी आपण स्वखर्चाने करणार असल्याची ग्वाही विश्वजित राणे यांनी या कुटुंबांना दिली आहे.

दैनिक गोमन्तक

गुळेली: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister of Goa) यांनी आज गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे या गावाला भेट देऊन पूरा मुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना धीर दिला. या पूरामुळे कणकिरे गावातील सुरेश गावडे,रत्ने गावडे,निता गावडे,शोभना गावडे,चित्रा वांतेकर, सुशानी वांतेकर यांची घरे कोसळली आहे. कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी आपण स्वखर्चाने करणार असल्याची ग्वाही विश्वजित राणे यांनी या कुटुंबांना दिली आहे.त्याच बरोबर पंधरा दिवसांचे राशन पोचते करणार असल्याचे सांगितले.तसेच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत करणार असल्याचे सांगितले. (Health Minister Vishwajeet Rane has promised help to the Goa flood victims.)

Health Minister of Goa Vishwajeet Rane

उपसरपंच नितेश गावडे यांनी या पूराची विस्तृत माहिती आरोग्य मंत्र्याना दिली.त्यांनीही आरोग्य मंत्र्याचे आभार मानले आहेत. या भेटीत कणकिरेतील महिलांनी आपली व्यथा मंत्र्यासमोर मांडली त्याला अनुसरुन सर्व ते सहकार्य आपण करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावेळी विनोद शिंदे, सुनिल मराठे,गुळेली सरपंच अपूर्वा च्यारी ,उपसरपंच व स्थानिक पंच नितेश गावडे,गुळेली पंच अनिल गावडे उपस्थित होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः भेट देऊन एकूण पाहणी करून आमचे दुःख जाणून मदत करण्याची ग्वाही दिल्याबद्दल कणकिरे पूर पिडितांनी आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT