Minister Vishwajit Rane Inspects Goa Dental College Facilities
पणजी: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज अचानकपणे गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला भेट दिली. त्यांनी या महाविद्यालयातील काही विभाग नव्या इमारतीत सुरळीतपणे स्थलांतरित केल्याबद्दल या भेटीदरम्यान समाधान व्यक्त केले. या इस्पितळातील शस्त्रक्रिया कक्ष आणि रुग्ण कक्षांचे काम पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या वसतिगृह इमारतीचे आणि त्यातील सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा कामाची पाहणी करत त्यांनी या कामाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या पाहणी दरम्यान केला. त्यांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या समक्ष काही सूचनाही केल्या. त्यांनी रुग्णांवर होत असलेल्या उपचारांच्या ठिकाणी जाऊनही पाहणी केली.
आरोग्यमंत्र्यांनी या भेटीविषयी एक्सवर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवीन इमारतीत यशस्वीपणे स्थलांतरित झालेले काही विभाग पाहून आनंद झाला. आम्ही आता नवीन शस्रक्रिया कक्ष आणि वॉर्ड जलद पूर्ण करण्यासाठी सरकारची संमती घेणार आहोत, जेणेकरून अधिक लोकांना दंत उपचाराच्या सुधारित सेवांचा लाभ घेता येईल. या पाहणीवेळी दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आयडा दे नरोन्हा दे आतायद उपस्थित होत्या. या पाहणीनंतर त्यांच्या कक्षात आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वसतिगृह अपग्रेडेशनच्या कामाच्या प्रगतीची पाहणी केली. आम्ही विविध आरोग्य सेवा पद्धतींमध्ये आरोग्य सेवा श्रेणी सुधारित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. रुग्णसेवेचा प्रत्येक पैलू राज्यात अव्वल दर्जाचे असल्याची खात्री या पाहणीच्या रुपाने करून घेण्यात आली आहे, असे राणे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.