IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

All We Imagine As Light At IFFI 2024 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मोठा बोलबाला झालेल्या ‘ऑल वुई इमॅजिन एज लाइट’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान सगळ्या सोशल मीडियामध्ये ‘ऑल वुई इमॅजिन एज लाइट’ची चर्चा होती.
All We Imagine As Light
IFFI 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2024 All We Imagine As Light

पणजी: ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मोठा बोलबाला झालेल्या ‘ऑल वुई इमॅजिन एज लाइट’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान सगळ्या सोशल मीडियामध्ये ‘ऑल वुई इमॅजिन एज लाइट’ची चर्चा होती.

दिग्दर्शिका पायल कपाडिया, अभिनेत्री छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचे व्हिडीओ बघायला मिळत होते. इफ्फीच्या पहिल्या दिवशी याच चित्रपटाचा पहिला शो बघायला मिळाला. पायल कपाडिया एफटीआयआयची विद्यार्थिनी होती, त्यामुळेही तिच्याबद्दल उत्सुकता आहे.

‘ऑल वुई इमॅजिन एज लाइट’मधून पायल सशक्त अशा महिला व्यक्तिरेखा आपल्यासमोर ठेवते; पण ही कथा फक्त त्यांची नाही, ती मुंबई महानगराचीदेखील आहे. जिथे कधी सूर्यास्त होत नाही, असे म्हटल्या जाणाऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर प्रभा, अनु आणि पार्वती यांच्या जगण्यातला संघर्ष, एकमेकींबद्दल वाटणारी काळजी, शहराला चिकटून राहिलेले त्यांचे अस्तित्व दाखवते. या चित्रपटात छाया कदम, कानी कस्तुरी, दिव्या प्रभा या तिघीजणी आपापल्या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत. छाया कदम पडद्यावर येते आणि कमाल करते. तिघीनींही अगदी सहज अभिनयातून या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत.

प्रभा, दिव्या आणि पार्वती तिघी वेगवेगळ्या वयोगटातल्या. कामामुळे एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकींमध्ये अधिक गुंफलं जातं. लेखक-दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनी या तीनही व्यक्तिरेखांमध्ये कमालीचा नैसर्गिकपणा दाखवला आहे. दिवसा-रात्री काम करणाऱ्या, शहरात भटकणाऱ्या, बस-ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या साऱ्या महिलांचे वेगवेगळ्या कोनातून केलेलं चित्रण या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी तयार करतं.

चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगवेगळ्या

या चित्रपटाला स्वतःची अशी एक गती आहे. तीच गती प्रत्येक दृश्य संपताना, दोन पात्रांच्या संवादामध्येही जाणवते. कधी कधी यातला शांतपणा, संथपणा अंगावर येतो. एका संथ लयीत सुरू असलेलं प्रभा, दिव्या आणि अनु यांचं आयुष्य वेगळं वळण घेतं आणि तिघी आपापल्या निर्णयावर येऊन पोहोचतात.

बिल्डरच्या तावडीतून स्वतःचं घर वाचवू न शकलेली पार्वती मुंबई सोडून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेते, डॉक्टरकडून प्रेमाची वागणूक मिळताच ‘माझं लग्न झालं आहे’ असं सांगून तयार होऊ लागलेल्या नात्यातून माघारी फिरणारी प्रभा आणि आपल्या मुस्लिम प्रियकराला बुरखा घालून भेटायला जाणारी दिव्या या पलायनवादी व्यक्तिरेखा नाहीत.

All We Imagine As Light
Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

समोर आलेल्या परिस्थितीत स्वतःच्या अटी-नियमांवर चालणाऱ्या आहेत. तिघीजणी मुंबई सोडून येतात आणि चित्रपट अधिक शांत, चिंतनशील बनतो. पायलचा पहिला चित्रपट तीन नायिकांच्या माध्यमातून एका वेगळ्या मुंबईचं दर्शन घडवतो. ‘लोग इसे सपनों का शहर क्यू कहतें हैं?’ हा संवाद लक्षात राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com