Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Valpoi: गोमंतकीय जनतेला सुखसमृद्धी लाभो, आरोग्‍यमंत्र्यांचे साकडे

Satari: श्री गणरायाकडे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी प्रार्थना केली

दैनिक गोमन्तक

Valpoi: सत्तरीतील आणि राज्‍यातील जनतेचे कल्‍याण होवो आणि त्‍यांना सुखसमृद्धी मिळो अशी प्रार्थना (Prayer) आपण श्री गणरायाकडे केली असल्‍याचे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सांगितले.

साखळी (Sanquelim) येथील आपल्‍या मूळ वाड्यावर निवासस्‍थानी श्री गणपतीचे पूजन केल्‍यानंतर राणे बोलत होते. राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे आणि विजयादेवी राणे यांनी मंत्रपुष्‍पांजलीच्‍या जयघोषात श्री गणरायाचे पूजन केले. या पूजनात मंत्री विश्‍‍वजीत राणे, पत्‍नी आमदार डॉ. दिव्‍या राणे आणि इतर कुटुंबीय यांनी सहभाग नोंदविला.

राणे यांच्‍या गणेशोत्‍सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून चित्रशाळेपासून पालखीतून श्री गणरायाची मूर्ती आणून तिची प्रतिष्‍ठापना करण्‍याची परंपरा आहे. या सोहळ्‍यात राणे कटुंबीय सहभागी होतात. आपल्‍या नेहमीच्‍या कामांना फाटा देऊन चतुर्थीच्‍या या सोहळ्‍यात सहभागी होणे हा मंगलदायी आनंद असतो, असे राणे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT