Bolmax Pereira objectionable comments on Shivaji maharaj  Dainik Gomantak
गोवा

Bolmax Pereira Case: छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बोलमॅक्स परेरांना मोठा दिलासा, गुन्हा रद्द

Bolmax Pereira Case: कळंगुट येथे शिवरायांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादानंतर काही दिवसांनी बोलमॅक्स यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

Pramod Yadav

Bolmax Pereira Case

गेल्यावर्षी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कॅथलिक धर्मगुरु बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणात फादर परेरा यांना मोठा दिलासा मिळाला असून, उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.

कळंगुट येथे शिवरायांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादानंतर काही दिवसांनी बोलमॅक्स यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

फादर बोलमॅक्स परेरा यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाजी महाराज देव नाहीत, असे वक्तव्य बोलमॅक्स यांनी केल्याने त्याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटले होते. त्यावेळी विधानसभा अधिवेशनात देखील त्याचे पडसाद पाहायला मिळाले होते.

शिवप्रेमींनी बोलमॅक्स विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर त्यांच्याविरोधात कलम 295 आणि 504 अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोलमॅक्स यांना याप्रकरणात नंतर जामीन देखील मंजूर करण्यात आला होता.

काय म्हणाले होते बोलमॅक्स परेरा?

काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये एक घटना घडली. येथील पंचायतीचा सरपंच सरपंच ख्रिचन असल्याने मोठा वाद झाला. छत्रपती शिवाजी देव झालेत, पण शिवाजी महाराज देव नाहीत. शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे.

या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे. असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT