Court on Pernem Noise Pollution Dainik Gomantak
गोवा

Pernem Noise Pollution: उपकरणांसह आस्थापनेही सील करा; पेडणे, हणजूणमधील ध्वनिप्रदूषणाबाबत खंडपीठाचे निर्देश

Pernem Noise Pollution: अर्नोल्ड डिसा यांच्‍या याचिकेची दखल

दैनिक गोमन्तक

Crack Down On Noise Pollution In Anjuna And Pernem: उत्तर गोव्यातील हणजूण व पेडणे पोलिस स्थानकाच्या हद्दीत ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांची संगीत उपकरणे जप्त करावीत.

तसेच एखाद्या आस्थापनाविरोधात वारंवार तक्रारी आल्यास ते आस्थापनच सील करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी, पोलिस व संबंधित यंत्रणांना दिले.

२०२१ साली सागरदीप शिरसईकर यांनी जनहित याचिकेद्वारे किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होऊनही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

ही याचिका प्रलंबित असताना अर्नोल्ड डिसा यांनीही कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवून बेकायदा पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

अर्नोल्ड डिसा यांच्‍या याचिकेची दखल

किनारपट्टी भागातील काही परिसरात ध्वनिप्रदूषणाची मोजमाप करणारी रिअल टाईम ध्वनिनिरीक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे. मात्र ज्या ठिकाणी ही यंत्रणा नाही, तेथे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे.

त्यामुळे या भागात प्रदूषण नियंत्रण मंडळाने अचानक भेटी देणे गरजेचे आहे, अशी सूचना अर्नोल्ड डिसा यांनी केली होती. त्याची दखल घेत आज उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळासह पोलिस व उपजिल्हाधिकाऱ्यांना अशा आस्थापनांविरोधात कठोर कारवाईसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmidas Borkar: गोमंतपुत्राचा गौरव! स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार 'लक्ष्मीदास बोरकर' यांच्या सन्मानार्थ टपाल साहित्य प्रकाशित

Mhadei Tiger Reserve: गोवा मुक्तीनंतर पर्यटन व्यवसाय जसा बेशिस्तीने विस्तारत गेला, तोच कित्ता जंगलांत राबवला जात आहे..

Kasule: तळ्याच्या रक्षणासाठी केली श्रीगणरायाची स्थापना, पेडण्याच्या राजाचा Video Viral

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाची प्रक्रिया ‘जीएसआयडीसी’कडून सुरू! 60 कोटींचा प्रकल्‍प होणार 2 वर्षांत

FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

SCROLL FOR NEXT