Kesarval Falls, Netravali Falls, Hivre Falls, Tambdi Surla Falls, Arvalem Falls, Sada Falls  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'हे' सहा धबधबे पाहिले आहेत का ?

गोवा (Goa) हे राज्य पर्यटनस्थळ (tourist) म्हणून खूप प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारे (beach) आणि बीच पार्टीज व्यतिरिक्त इतरही गोष्टी बघण्यासारख्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा (Goa) हे राज्य पर्यटनस्थळ (tourist) म्हणून खूप प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारे (beach) आणि बीच पार्टीज व्यतिरिक्त इतरही गोष्टी बघण्यासारख्या आहेत.राज्यात अशी अनेक लपलेले धबधबे (waterfalls) आहेत ज्यांची माहिती बर्‍याच लोकांना नाही. पर्यटक बर्‍याचदा बीच हॉपिंग आणि पार्टीजला हजेरी लावतात पण मोहक धबधबे गमावतात. गोव्याला केवळ सुंदर समुद्रकिनारेच नव्हे तर चित्तथरारक धबधबे देखील लाभले आहेत जे तुम्हाला विस्मयकारक ठरतील. गोव्यात काही धबधबे असे आहेत की तुम्ही तिथे भेट-देणे आवश्यक आहे.(Have you seen these six waterfalls in Goa)

केसरवल फॉल्स : ‘केसरवल’ (Kesarval Falls) हे गरुडांच्या प्रादेशिक शब्दापासून बनले आहे. असा विश्वास आहे की पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ते पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

नेत्रावली फॉल्स : 'नेत्रावली' (Netravali Falls) हे असं ठिकाण आहे की तुम्ही इथे शांत आणि निर्मळपणा आहे. तुम्हाला जवळच्या व्यक्तीसोबत शांत जागी बसायचं असेल तर तुम्ही इथे एकदा तरी नक्की भेट द्या, हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे.

हिवरे फॉल्स : 'हिवरे' फॉल्स (Hivre Falls) हे वाल्पोई शहराजवळ आहे, हे ठिकाण प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये असावे. नयनरम्य ठिकाण असेलेली ही जागा तुम्हाला सोडू वाटणार नाही.

तांबडी सुर्ला फॉल्स : तांबडी सुर्ला (Tambdi Surla Falls) हा पश्चिमेकडील घाटात लपलेला हा प्राचीन धबधबा आहे. हे कॅसकेड भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोल्लेम नॅशनल पार्कमध्ये आहे.

अरवलेम फॉल्स : अरवलेम (Arvalem Falls) हा धबधबा उत्तर गोव्यात आहे. जेव्हा तुम्ही या धबधब्यावर जातात तेव्हा आपण अरवलेम रॉक-कट लेण्यांना भेट देऊ शकता, ज्या 12 व्या शतकात बौद्ध भिक्खूंनी कोरलेल्या मानल्या जातात.

सदा फॉल्स : सदा या धबधब्यावर (Sada Falls) पोहोचण्यासाठी आपल्याला 4-किमी चा ट्रेक करावा लागतो. अंदाजे 200 फूट उंचीवरून हे पाणी गोव्यातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT