Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Viral News: रात्री इथं विचित्र घटना घडतात! टॅक्सी चालकाने गोवा विमानतळावर अनुभवलेला 'व्हायरल' थरार काय?

Pramod Yadav

Mopa Airport Goa Horror Story

पेडणे: उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भुताटकी असल्याचा अनेक कथा व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी याबाबत एक Instagram Reel देखील चांगलीच व्हायरल झाली.

रात्री दहानंतर विमानतळावर एकही गोमंतकीय कामगार काम करत नाही. या प्रश्नातून विमानतळवरील भुताटकीच्या विविध कथांनी जन्म घेतला. त्यातीलच एक कथा म्हणजे एका टॅक्सी चालकासोबत घडलेला थरारक प्रसंग.

झाले असे की गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात मांद्रेचे आमदार जीत आरोलकरांनी मोपा विमानतळावर रात्री दहानंतर गोमंतकीय कामगार नसतात, असा प्रश्न उपस्थित केला. यावरुन आमदार सरदेसाईंनी मोपावर भुताटकी आहे का काय? असा उपरोधात्मक सवाल उपस्थित केला.

यावरुन मोपावर भुताटकी असल्याच्या चर्चांना उधाण आले. काहींनी तर व्हिडिओ आणि Instagram Reel देखील केल्या. मोपावरील भुताटकीच्या कथा सत्य की असत्य यात न जाता अनेकांनी या कथा एकमेकांसोबत शेअर केल्या.

मोपावर भुताटकी असेल तर ती फक्त गोमंतकीयानांच का त्रास देते विमानतळावर कार्यरत इतर कामागारांना का त्रास होत नाही असा देखील एक तर्क लावला जातो. पण, मोपावरील भुताटकीच्या कथा चांगल्याच व्हायरल होत आहेत.

टॅक्सी चालकाचा मोपावरील तो थरारक प्रसंग काय?

मध्यरात्रीच्या सुमारास राजू नावाचा टॅक्सी चालक एक वृद्ध प्रवाशाला घेऊन मोपा विमानतळावर जात होता. मध्यरात्रीची वेळ आणि मोपाकडे जाणाऱ्या मार्गावर पूर्ण अंधार होता. टॅक्सी चालकाला प्रवाशाला सोडून लगेच माघारी परतण्याची घाई होती.

विमानतळाकडे जाताना मार्ग अधिक अंधारमय होत होता. रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते, एवढ्यात टॅक्सीत बसलेला वृद्ध बोलला, 'रात्री इथं फार विचित्र घटना घडतात'. टॅक्सी चालक काहीसा घाबरला कारच्या स्टिअरिंगवर त्याचे हात अधिक घट्ट झाले.

कार अधिक वेगाने घेऊन जात तो विमानतळावर दाखल झाला. आला तुमचा स्टॉप म्हणत चालक माघारी फिरला तर मागच्या सीटवर कोणीच नव्हते. यामुळे टॅक्सी चालक चांगलाच घाबरला.

असा प्रसंग सांगितला जातो, दरम्यान यात तथ्य किती? तो टॅक्सी चालक कुठे आहे? आणखी कोणासोबत असा प्रसंग घडला का? याबाबत कधीच माहिती समोर आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

Goa Sports: केंद्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याची यशस्वी कामगिरी! सक्षम, धिमनला रौप्यपदके

Accident In Goa: दत्तवाडी साखळीत बुलेट आणि चारचाकीचा भीषण अपघात

Devara Part 1: गोव्यातील वॉटर ॲक्शन सीन, गाणी आणि बरचं काही... NTR ने चित्रपटाबाबत केले अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT