Delhi - Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Delhi Goa Flight: लज्जास्पद! प्रवासादरम्यान विमानात महिलेसमोर आक्षेपार्ह कृत्य, विकृतास अटक

Goa Crime: विमान हवेत असताना संशयिताने आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Delhi Goa Flight Woman Passenger Harassed

दाबोळी: दिल्लीतून गोव्याला येणाऱ्या विमानात महिला सहप्रवाशासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हरियाणातील २३ वर्षीय तरुणाला दाबोळी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) ही घटना घडली.

जितेंदर जंगियन (वय २३, पानिपत - हरियाणा) असे दाबोळी विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिताने नवी दिल्ली येथील २८ वर्षीय महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पीडित महिलेने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, एअर इंडियाच्या एआय -८८५ या दिल्ली ते गोवा फ्लाईटमध्ये प्रवास करताना ही घटना घडली. मंगळावारी विमानाने सकाळी अकरा वाजता दिल्लीतून गोव्यातील दाबोळी विमानतळासाठी उड्डाण घेतले.

विमान हवेत असताना संशयिताने आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

संशयिताने अंगावर चादर घेऊन आक्षेपार्ह कृत्य केले. महिलेचे लक्ष जावे म्हणून त्याने एक बाजू खुली ठेवली होती, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. विमान दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT