Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Samaj: भंडारी लोकप्रतिनिधींचे 'मनोमीलन'! हरवळे येथील गाैरव सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर

Bhandari Samaj Goa: हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थान सभागृहात श्री देव रूद्रेश्वर देवस्थान समिती व श्री देव रूद्रेश्वर रथोत्सव समितीतर्फे राज्यातील भंडारी समाज लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: भंडारी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा आणि मजबूत समाज म्हणून मानला जातो. आज या समाजात निर्माण झालेले विविध विषय हे समाजातीलच लोकांनी निर्माण केलेले आहेत. परंतु, हे विषय समाजाच्या उत्कर्षासाठी सोडवून सर्वांनी संघटीत होण्याचा निर्धार करावा, असे असे आवाहन आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थान सभागृहात श्री देव रूद्रेश्वर देवस्थान समिती व श्री देव रूद्रेश्वर रथोत्सव समितीतर्फे राज्यातील भंडारी समाज लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भंडारी समाजातील मंत्री, आमदार तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडारी समाजातील नेत्यांचे मनोमीलन पाहायला मिळाले.

समाजाच्या कार्यात अकारण वेगळ्या गोष्टींचा समावेश करून स्वतःला मागे किंवा समाजकार्यापासून दूर राहणे योग्य नव्हे, असे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले. श्री रूद्रेश्वर मंदिरासमोरील धबधब्याच्या परिसरात खाण कंपनीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे या धबधब्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली असून त्यांनी या पवित्र क्षेत्रापासून तीन किलो मीटर अंतरावर खाणकाम करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र कंपनीकडून घेतले जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु अद्याप हे प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले नाही, असे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

पर्वरीत हॉस्टेल उभारू

गोव्यात ६० टक्के लोकसंख्या भंडारी समाजाची असून या लोकसंख्येचे १० टक्के लोक आज लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात निवडून यायला हवेत. त्यासाठी पक्षीय भेदभाव बाजूला ठेऊन काम करावे लागेल. तसेच समितीने भंडारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी पर्वरी येथे हॉस्टेल उभारण्यासाठी भुखंडाची मागणी करावी, असे आरोलकर यांनी सांगितले.

दिग्गजांची उपस्थिती

आजच्या कार्यक्रमात कृषीमंत्री रवी नाईक, आमदार जीत आरोलकर, विरेश बोरकर, माजी सभापती नरहरी हळदणकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, दिलीप परूळेकर, जयेश साळगावकर, ‘आप’चे अध्यक्ष अमित पालेकर, ‘आरजी’चे सचिव विश्वेश नाईक, गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दिपक कळंगुटकर, ‘मगो’चे अनंत नाईक, शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर, सुभाष किनळकर, मुखत्यार वासुदेव गावकर, दीपक नाईक, जनार्दन भंडारी, धर्मा चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश नाईक आदी दिग्गजांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT