Bhandari Samaj Goa: '..तर आमची समिती बरखास्त करू'! भंडारी समाज अध्यक्षांचे प्रतिपादन; निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक केंद्रीय भंडारी समाजाने रविवारी मडगावातील लिंगायत सभागृहात सासष्टीतील समाजबांधवांची बैठक घेऊन सासष्टी भंडारी समाज समितीची स्थापना केली.
Gomantak Bhandari Samaj
Bhandari Samaj GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोमंतक केंद्रीय भंडारी समाजाने रविवारी मडगावातील लिंगायत सभागृहात सासष्टीतील समाजबांधवांची बैठक घेऊन सासष्टी भंडारी समाज समितीची स्थापना केली. अध्यक्षपदी दामोदर श्रीकांत नाईक यांची निवड केली. दामोदर नाईक यांचे नाव विनोद शिरोडकर यांनी सुचविले तर सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.

याप्रसंगी गोमंतक केंद्रीय भंडारी समाजाचे अध्यक्ष उपेंद्र गावकर यांनी सांगितले की, सध्या समाजाच्या केंद्रीय समिती संदर्भातील प्रकरण न्यायालयात आहे. जर न्यायालयाने देवानंद अर्जुन नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समिती बेकायदेशीर ठरवून बरखास्त करण्याचा आदेश दिला तर आपणही आपली समिती बरखास्त करून निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे.

सासष्टी भंडारी समितीतील इतर पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे : सरचिटणीस - शिवदास नाईक शिरोडकर (सूचक - सुरेंद्र कवठणकर), खजिनदार - संदीप नाईक (सूचक - दामोदर नाईक), उपाध्यक्ष - लतीकांत नाईक, विवेक शिरोडकर, प्रवीण नाईक, आत्माराम आरोलकर, विशाल शिरोडकर, दत्ता नाईक, विठू सुकडकर, तुकाराम गोवेकर, नानी केरकर, सुरेंद्र कळंगुटकर,

सचीव - दामोदर मालवणकर, सचिन सातर्डेकर, मनोज शिरोडकर, समीर नाईक, सह खजिनदार - एकनाथ शिरोडकर, निळकंठ नाईक, सदस्य - अशोक कोरगावकर, अॅड सुदेश बोरकर, गुरू विर्डिकर, अॅड. संतोष नाईक, रवींद्र (राजू) नाईक (नगरसेवक), विनोद शिरोडकर, कृष्णा नाईक, चंद्रकांत खांडेपारकर, संदेश नाईक, अतुल नाईक, अनुप मुळे, सिद्धराज पेडणेकर यांचा समावेश आहे.

उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखालील गोमंतक केंद्रीय भंडारी समाजाने यापूर्वी ९ तालुक्यातील समित्या निवडल्या होत्या. आजची ही दहावी तालुका समिती असल्याचे सांगण्यात आले. इतर दोन तालुक्यांतील समित्या लवकरच निवडल्या जातील.

Gomantak Bhandari Samaj
Bhandari Samaj Goa: भंडारी समितीच्या सुनावणीवेळी गोंधळ! काही जणांना कक्षाबाहेर काढण्याची मागणी; जिल्हा निबंधकांसमोर नाट्य

बैठक, समिती बेकायदेशीर : धनंजय मयेकर

उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखालील गोमंतक केंद्रीय भंडारी समाजाने आज जी बैठक बोलावली व समिती निवडली ती बेकायदा असल्याचे देवानंद अर्जुन नाईक यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समिती अंतर्गत सासष्टी तालुका अध्यक्ष धनंजय मयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

आजची बैठक ही समाजातील लोकांची दिशाभूल व गैरवापर करण्यासाठी असल्याचेही मयेकर यांचे म्हणणे आहे. देवानंद अर्जुन नाईक यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समिती २०१४ ते २०२९ या कार्यकालासाठी असून ती कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Gomantak Bhandari Samaj
Gomantak Bhandari Samaj: भंडारी समाजाची 3 शकले! वाद पोहोचणार पंतप्रधान मोदींपर्यंत; एकमेकांवर दोषारोपाने वाढला गोंधळ

या समितीला गोवा सरकार, जिल्हा निबंधक कार्यालय, उत्तर आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ सोसायटीज यांनी नोंदणी क्रमांक २८२ गोवा २०१५ च्या अंतर्गत अधिकृत मान्यता दिली आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे जर कोणी बेकायदेशीर समितीकडे आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहार केले तर गोमंतक भंडारी समाजाच्या धनंजय मयेकर यांच्या अध्यक्षतेखालील सासष्टी समिती जबाबदार राहणार नाही, असेही मयेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com