Parra  Dainik Gomantak
गोवा

Parra News : हरवळेत वैविध्यपूर्ण पक्ष्यांचे दर्शन; वृक्षवल्ली निवासी शिबिर

Parra News : विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचा उपक्रम,समारोप सत्रात डिचोली भागशिणाधीकारी लीना कळंगुटकर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, केरी, सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजतर्फे सरकारी प्राथमिक विद्यालय खालचे हरवळे, साखळी येथे दोन दिवशीय 'वृक्षवल्ली निवासी शिबिर' मोठ्या उत्साहात झाले. या शिबिरात ३० पक्ष्यांचे निरीक्षणही मुलांनी केले.

या शिबिरा दरम्यान शालेय पाठ्यपुस्तकातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित ''जंगल बुक'' या मथळ्याअंतर्गत संकेत नाईक यांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील असलेल्या जैवविविधतेचे पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

रामकृष्ण गावस यांनी नदी काठावरील मिळणाऱ्या सपट व गुळगुळीत दगडावर फॅब्रिक रंगाचे वापर करून स्टोन पेंटिंगचे कार्यशाळा घेण्यात आली.

दरम्यान १३०० वर्षा पूर्वीची हरवळे गुंफा पाहिली. इतिहास अभ्यासक अमेय किंजवडेकर यांनी यावर माहिती दिली. संतोषी नाईक यांनी निसर्गावर आधारित मुलांचे खेळ घेतले. सनिश अवखळे यांनी विद्यार्थांना जग जंगल जमीन, प्राणी जगत या संदर्भात माहितीपट दाखवला.

समारोप सत्रात डिचोली भागशिणाधीकारी लीना कळंगुटकर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, डिचोली तालुका क्रीडा संघटक राजू पवार, विवेकानंद पर्यावरण जागृत फौजचे सचिव दीपक गावस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास अंबिके, पालक शिक्षक अध्यक्ष प्रतिभा भंडारी, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष तुषार मोरजकर आदी उपस्थित होते. शिबिराला स. प्रा. वि. पुनर्वसन-साळ डिचोली,

स.प्रा.वि. धुळापी तिसवाडी, स.प्रा.वि. सर्वण डिचोली, स.प्रा.वि. पार- मुळगाव, शांतादुर्गा हायस्कूल व प्राथमिक विद्यालय डिचोली, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय वानोशी, दोडामार्ग, प्राथमिक विद्यालय हेडगेवार कारापूर-साखळी, युनिटी प्राथमिक विद्यालय वाळपई, स. प्रा. वि. बोर्डे- डिचोली. आदी प्राथमिक विद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थांनी भाग घेतला होता. शिबीराचे संयोजन राजू पवार, संकेत नाईक व शिक्षिका स्वाती कांबळे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT