Harmal Dainik Gomantak
गोवा

Harmal News : ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करा : देविदास कुडव

Harmal News : त्यासाठी आवश्यक अभ्यास साधनांचा लाभ घेऊन उच्चशिक्षित व्हावे, असे प्रतिपादन पर्वरी येथील डीइटी कॉलेजचे प्राचार्य देविदास कुडव यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

हरमल, सध्याच्या युगात अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अत्युच्च ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला हवेत.

त्यासाठी आवश्यक अभ्यास साधनांचा लाभ घेऊन उच्चशिक्षित व्हावे, असे प्रतिपादन पर्वरी येथील डीइटी कॉलेजचे प्राचार्य देविदास कुडव यांनी केले

कोरकणवाडा येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच रजनी इब्रामपूरकर, माजी अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कोरकणकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बांधकर, देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत कोरकणकर, प्रमोद कोरकणकर, राजन बांधकर, जनार्दन कोरकणकर, प्रभाकर बानकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी आव्हानात्मक भूमिका घेऊन यश संपादन करण्याचे आवाहन निवृत्त अधिकारी उमाकांत कोरकणकर यांनी केले. माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बांधकर, सरपंच रजनी इब्रामपुरकर यांनी विचार मांडले.

यावेळी प्राचार्य देविदास कुडव यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भिवा मांद्रेकर,प्रकाश कोरकणकर, रूपेश कोरकणकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT