Anti-plastic awareness
Anti-plastic awareness Dainik Gomantak
गोवा

Plastic Awareness : हरमल विद्यालयातर्फे प्लास्टिकविरोधी जनजागृती

गोमन्तक डिजिटल टीम

Plastic Awareness :

हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओशन मॅटर्स: आमच्या समुद्रांची सुरक्षितता’ प्रकल्पांतर्गत ब्लू मोहिमेचा एक भाग म्हणून, ‘मायक्रोप्लास्टिक आणि त्याचा सागरी जीवनावर परिणाम’ या विषयावर एक सत्र आयोजित केले होते.

या विषयावर विशेषज्ज्ञ म्हणून गणपत पार्सेकर महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापिका सुषमा साळगावकर यांनी मार्गदर्शन केले.

स्थानिक लोक, पर्यटक, व्यापारी आणि दुकानदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हरमल किनाऱ्यावर प्लास्टिकविरोधी रॅली, समुद्रकिनारा स्वच्छता आणि कागदी बॅगांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. कान्होजी यांनी मार्गदर्शन केले.

१५० विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग

या सत्राच्या समन्वयक शिक्षिका गीता कानोजी यांच्यासमवेत एकूण १५० विद्यार्थ्यांनी या सत्रात सहभाग घेतला.

याच अभियानांतर्गत समन्वयक शिक्षिका श्रीमती कानोजी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात आली. कानोजी यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

SCROLL FOR NEXT