Harmal  Dainik Gomantak
गोवा

Harmal News : हरमल बीच रोडवर कोसळले आंब्याचे झाड

Tree Collaps : दुपारी दोनच्या सुमारास हे भले मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल, येथील हरमल बीच रोड बेकरीनजीक असलेल्या एका बंगल्याच्या आवारात असलेले आंब्याचे झाड मुळापासून उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली.

पंच सुशांत गावडे, सांतान फर्नांडिस, समाज कार्यकर्ते राजेश माजी आदींनी दुचाकी जाण्यासाठी झाडांच्या फांद्या हटविल्याने वाहतूक कोंडी टळली.

दुपारी दोनच्या सुमारास हे भले मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

दरम्यान, या रस्त्यानजीक अनेक धोकादायक झाडे व माड आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांमार्फत अहवाल तयार करून घ्यावा व धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी पंच सांतान फर्नांडिस व सुशांत गावडे यांनी यावेळी केली.

गेल्या आठवड्यात खालचावाडा येथील पांडुरंग खवणेकर यांच्या घरानजीकचे झाड पडले व दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराची भिंत कोसळली. त्या कुटुंबास नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: गोव्यात 'फॅमिली पॅक' स्टंट! स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर 5 जणांचा जीवघेणा प्रवास; गवंडाळी येथील थरारक व्हिडिओ व्हायरल

Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

VIDEO: युवराज इज बॅक! 6 षटकार, 11 चौकार... न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोळवलं; ठोकलं वादळी शतक!

Goa Leopard Attack: सत्तरीत वन्यप्राण्यांची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवजोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT