Verna Pharma Companies Dainik Gomantak
गोवा

Verna Pharma Companies : वेर्णात फार्मा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची सतावणूक; या आहेत कामगारांच्या प्रमुख मागण्या

पणजीत आंदोलन : युनियन स्थापन केल्यामुळे बदल्या

दैनिक गोमन्तक

Verna Pharma Companies : राज्यातील अनेक कंपन्यांमधील कामगारांनी युनियनची स्थापना केली आहे. मात्र, वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस संघटनेमार्फत युनियनची स्थापना केल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे प्रकार सुरू असून याबाबत सरकार तसेच कामगार आयोग मौन बाळगून असल्याची टीका कामगार नेते सुहास नाईक यांनी केली.

ते आझाद मैदान येथे फार्मा कर्मचाऱ्यांनी केलेल्या धरणे आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी ‘आयटक’चे राजू मंगेशकर, ख्रिस्तोफर फोन्सेका उपस्थित होते. फार्मा कंपनी व्यवस्थापनाद्वारे १२ तास काम करून घेऊन कर्मचाऱ्यांना आठ तासांचे वेतन देण्यात येते. त्यांना सुट्टी दिली जात नाही.

कंपनीचे म्हणणे न ऐकल्यास हिमाचल किंवा महाराष्ट्रात बदली करण्याच्या धमक्या दिल्या जातात. सुमारे १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न राजू मंगेशकर यांनी केला. फोन्सेका म्हणाले, आतापर्यंत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, तर काहींना कामावरून काढून टाकले आहे.

कामगार आयोगाची चुप्पी

कामगारांच्या विरोधात पोलिस यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. कामगारांची सतावणूक होत आहे. याबाबत कामगार आयोगाला कळविले आहे. तरीदेखील कामगार आयोग, कामगार मंत्री तसेच सरकार शांत आहे. आम्ही हा विषय शांतताप्रिय मार्गाने सोडवू इच्छितो. त्यामुळे सरकारने याप्रश्‍नी योग्य ती कारवाई करणे गरजेचे असल्याचे सुहास नाईक यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • कंपन्यांकडून कामगारांची सतावणूक बंद करावी.

  • कर्मचाऱ्यांची हिमाचल वा इतर राज्यांत बदली करू नये.

  • अतिरिक्त कामाचा मोबदला (वेतन) द्यावा.

  • कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सुविधा पुरवाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT