Har Ghar Tiranga in Britain TWITTER
गोवा

'हर घर तिरंगा अभियान 2.0'; पणजी, मडगावातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार राष्ट्रध्वज

भारतातील नागरिक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून 25 रुपयांच्या किमतीत राष्ट्रध्वज खरेदी करू शकतात.

Rajat Sawant

Har Ghar Tiranga Abhiyan 2.0 Post Offices Sell National Flag : स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून सांस्कृतिक मंत्रालयाने 'हर घर तिरंगा अभियान' सुरू केले होते.

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 'हर घर तिरंगा अभियान 2.0' राबवण्याची घोषणा केली आहे. नागरिक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून 25 रुपयांच्या किमतीत राष्ट्रध्वज खरेदी करू शकतात.

नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमान जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी, नागरिक पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाइन तिरंगा ऑर्डर करू शकतात. प्रत्येक नागरीक 5 ध्वजांपर्यंत ऑर्डर देऊ शकतात.

दरम्यान गोव्यातील नागरिकांनी राष्ट्रध्वजांच्या ऑर्डरसाठी पोस्ट ऑफिसच्या पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच राष्ट्रध्वज 7 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत असे खात्यामार्फत कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

Nuvem: नुवे भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित, माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांचा उपक्रम : भाजी लागवडीसाठी प्रोत्साहन

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT