CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: डिजिटल क्रांतीकडे गोवा! 'हर घर फायबर' योजनेमुळे स्वप्न होतंय साकार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

CM Pramod Sawant: ‘हर घर फायबर’ योजनेच्या माध्यमातून डिजिटल गोवा निर्माण करण्याचे स्वप्नही प्रत्यक्षात उतरत आहे. कायदे सरकार करू शकते; पण त्यांचे पालन जनतेने करणे महत्त्वाचे आहे.

Sameer Amunekar

पणजी: ‘हर घर फायबर’ योजनेच्या माध्यमातून डिजिटल गोवा निर्माण करण्याचे स्वप्नही प्रत्यक्षात उतरत आहे. कायदे सरकार करू शकते; पण त्यांचे पालन जनतेने करणे महत्त्वाचे आहे तसेच गोवा स्वच्छ व हरित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. २०३७ पर्यंत विकसित गोवा हे आपले सामूहिक लक्ष्य असावे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येणे गरजेचे आहे. मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केल्यास गोवा लवकरच देशातील सर्वात विकसित राज्य ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगितले.

गोवा क्रांतिदिनानिमित्त आझाद मैदान, पणजी येथे शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुदिन ढवळीकर,

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव सी. कांदावेलु, गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास रघुनाथ नाईक, वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून शहिदांना मानवंदना दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी गोवा मुक्त झाले. जर वेळेवर गोवा मुक्त झाले असते, तर गोव्यातील विकासाचा वेग आणखी वेगळा असता. मात्र, तरीही आज आपण आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून विकासाचा वेग कायम राखत आहोत.

अग्वाद तुरुंगाचे रूपांतर संग्रहालयात

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, १४ कोटी रुपये खर्चून अग्वाद तुरुंगाचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले असून, यात गोव्याच्या इतिहासाची ओळख देणारा ॲनिमेशन चित्रपटही दाखवला जातो. हे संग्रहालय नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

ऐक्याचे उदाहरण!

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या तिन्ही समाजाने एकत्र येऊन पोर्तुगिजांच्या विरोधात लढा दिला. हे गोमंतकीय ऐक्याचे एक सुंदर उदाहरण आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांपासून आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी विकासाच्या दिशेने पावले टाकली आहेत. आपण शिक्षित राज्य होण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले आणि यशस्वीदेखील झालो.

स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्णतेकडे

राम मनोहर लोहिया यांचे जे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गोवा छोटे राज्य असले तरी ‘जीडीपी’च्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत. हे यश केवळ सरकारचे नाही तर जनतेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

SCROLL FOR NEXT