Review by BJP Dainik Gomantak
गोवा

भाजपकडून आढावा; नेते, उमेदवारांकडून मतदानाच्या कामगिरीचे मूल्यांकन

कॉंग्रेसमध्ये खुशी, भाजपात उहापोह..!

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी टक्का घसरलेले मतदान झाले असल्याने सत्ताधारी भाजपमध्येही चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) भाजपच्या निवडणुकीतील मतदानाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी पणजीत बैठक सुरू आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची उपस्थिती असून, पक्षाच्या सर्व उमेदवारांनी हजेरी लावली आहे.

यंदा प्रथमच भाजपने आपल्या पक्षाच्या इतिहासात राज्यातील सर्व विधानसभेच्या (Assembly) 40 जागा लढवल्या असून, सर्व 1722 बूथनिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. यानंतर निवडणुकीतील (Election) सर्व घडामोडी कार्यकर्त्यांची कामगिरी यांचीही चर्चा झाली. या सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर आभारही मानण्यात आल्याची माहिती आहे.

आता सत्ता स्थापनेसाठीच्या कवायतीसाठी करावयाच्या प्रयत्नांसंबधी कोअर कमिटीची दुसरी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत उमेदवारांची कामगिरी, विरोधकांचे डावपेच आणि मतदारसंघातील स्थिती यांची तपशीलवार चर्चा होत आहे. सुरवातीला प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी राज्यातील पक्षाची एकूण स्थिती यावर प्रकाश टाकला.

कॉंग्रेसमध्ये खुशी, भाजपात उहापोह..!

कॉंग्रेसने (Congress) मंगळवारी आपल्या सर्व उमेदवारांसह मित्रपक्ष असणाऱ्या गोवा फॉरवर्डच्या तिन्हीही उमेदवारांची मूल्यांकन बैठक मिरामार येथील हॉटेलमध्ये घेत कॉंग्रेसला 26 जागा मिळण्याचा दावा केला आहे. तर सत्ताधारी भाजपने (BJP) दहापेक्षा कमी जागा मिळतील, असे भाकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची ही महत्त्वपूर्ण बैठक होत असून, पक्षाच्या कामगिरीवर प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याकडून भाष्य अपेक्षित आहे. पणजीतील बैठकीनंतर ते सोमवारी झालेल्या मतदान आणि पक्षाच्या कामगिरीविषयी ते माध्यमांना माहिती देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT