Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

‘हस्तकला’ला 62.35 लाखांचे उत्पन्न

मंत्री रवी नाईक यांची माहिती; गणेश मूर्तीकारांच्या संख्येत दरवर्षी घट

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाला गतवर्षी 2020-21 कोरोनाचा चांगलाच फटका बसला. महामंडळाच्या विविध उत्पादीत वस्तूंच्या खरेदीत 2019-20 च्या तुलनेत निम्म्यावर घट झाली होती. ती घट 2021-22 मध्ये भरून निघाली असे आकडेवारीवरून म्हणता येईल.

2020-21 मध्ये 32 लाख 8 हजार 607 रुपये उत्पन्न मिळाले होते, परंतु कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा वाढला आणि ते उत्पन्न 2021-22 मध्ये 62 लाख 35 हजार 465 रुपयांवर पोहोचल्याची माहिती हस्तकला खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी दिली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हस्तकला ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळाविषयी विरोधी आमदारांनी अतारांकित प्रश्‍न उपस्थित केले होते. त्या प्रश्‍नांना मंत्री नाईक यांनी लेखी उत्तर दिले आहे.

जीएचआरएसएसआयडीसीमध्ये अद्याप विविध 70 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर कारकूनपदाची (एलडीसी) सात पदे भरली असून सर्वांना 19 हजार रुपये वेतन असल्याचे उत्तर आमदार विरेश बोरकर यांच्या प्रश्‍नाला लेखी स्वरूपात मंत्री नाईक यांनी दिले आहे.

मूर्तीकारांना मदत

महामंडळातर्फे 2012 पासून मूर्तीकारांना अर्थसाह्य मिळावे यासाठी त्यांच्या मूर्तीवर सवलत दिली जाते. मनोहर पर्रीकर यांच्या काळात ही योजना कार्यान्वित झाली, त्यावेळी 526 लाभार्थी महामंडळाकडे नोंदले गेले होते. आता ते कमी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT