Influenza A (H3N2) Virus
Influenza A (H3N2) Virus Dainik Gomantak
गोवा

H3N2 Virus : मास्क वापराची गरज भासणार!

दैनिक गोमन्तक डिजिटल

Influenza A (H3N2) Virus: राज्यासह देशात कोरोना आणि ‘एच3एन2’ फ्ल्यू सदृश्‍य बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांचा प्रवास पुन्हा मास्कच्या दिशेने सुरू झाला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वीच आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

शेजारील महाराष्ट्र सरकारनेही तसे निर्देश जानेवारी ते मार्च आणि ऑगस्ट ते ऑक्टोबरचा कालखंड हा कोरोनाच्या उद्रेकाचा कालखंड मानला जातो. अशातच ‘एच३एन२’ सदृश्‍य आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये वाढत असल्याने अनेक रुग्णालयांत गर्दी आहे.

दीर्घकाळ राहणारा ताप, खोकला, सर्दी (गळणारे नाक) अंगदुखी ही या इन्फ्लुएंझाचे लक्षणे असून अनेकांत ती आढळून येत आहेत. याचे काही नमुने पुण्यातील विषाणू प्रयोगशाळेत पाठविली आहेत.

मात्र, ते अद्यापही प्रलंबित असल्याने राज्यात ‘एच३एन२’चे रुग्ण आहेत की नाही? हे अस्पष्ट आहे. मात्र, नेहमीच्या फ्लूचे रुग्ण राज्यात आहेत, असे सरकारच्या साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

आहेत. राज्यात मार्चच्या सुरवातीला १० च्या आत असलेली कोरोना रुग्णसंख्या आता शंभरच्यावर गेली आहे.

रुग्णांत मोठी वाढ

गोव्यात रविवारी कोरोनाचे 18 नवे बाधित सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 103 झाली आहे. तर दुसरीकडे देशभरात 129 दिवसांनंतर एका दिवसात 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत.

देशात एकूण कोरोनाचे सक्रीय रुग्ण 5 हजार 915 झाले आहेत. तर मागच्या 24 तासांमध्ये 1 हजार 71 रुग्ण बाधित झाले आहेत.

देशातून व आपल्यातून कोरोना विषाणू जाणे अवघड आहे. आपल्याला त्याच्यासोबत राहावे लागणार आहे. फक्त यामध्ये होणारे बदल (म्यूटेशन) किती त्रासदायक आहेत, यावर कोरोनाच्या लाटेचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. गोव्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याने त्याचा राज्यातील नागरिकांसाठी फायदाच होईल.

- डॉ. प्रशांत सूर्यवंशी,

साथ रोग विभाग प्रमुख

सध्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व काही सरकारवर सोडून देणे योग्य नाही. अगोदरच विविध आजारांनी त्रस्त असणारे आणि 65 वर्षांवरील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचा असावा. संख्या नियंत्रणाबाहेर गेल्यास याबाबतची आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) लागू करावी लागेल.

- डॉ. शेखर साळकर, सदस्य, कोरोना कृती दल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT