Protest 

Gram Sabha

 

Dainik Gomantak 

गोवा

गुळेलीची विशेष ग्रामसभा सोमवारी झालीच नाही

सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात नागरीक पंचायत कार्यालयाकडे जमले होते.

दैनिक गोमन्तक

गुळेली: गुळेलीची पुन्‍हा बोलावण्‍यात आलेली विशेष ग्रामसभा सोमवारीसुद्धा झालीच नाही. पंचायत मंडळाने आजच्‍या ग्रामसभेकडे पाठ फिरविल्‍याने ग्रामस्थांनी नाराजी व्‍यक्त केली. आजही कालच्‍या प्रमाणे मैंगीणे येथील पंचसदस्‍य अर्जुन मेळेकर वगळता बाकी इतर पंच गैरहजर राहिले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत ग्रामसभा (Gram Sabha) होत नाही आणि बीडीओ किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून आमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी केला.

गोवा मुक्तिदिनी (Goa Liberation Day) गुळेलीची (Guleli) ग्रामसभा आयोजित केली होती. मात्र, ग्रामसभेला एकमेव पंचसदस्य अर्जुन मेळेकर वगळता इतर सर्व पंच मंडळी सरपंच, उपसरपंच व पंचायतीचे सचिव इतर ठिकाणी ताबा असल्याचे कारण पुढे करून गैरहजर राहिले होते. बदली सचिवांना ग्रामसभेला उपस्थित लोकांना तोंड द्यावे लागले. इतर पंचसदस्य अनुपस्थित राहिले म्हणून लोकांच्या आग्रहाखातर आज ग्रामसभा घेण्याचे ठरविले होते. तरीही पंचायत मंडळापैकी एक वगळता कुणीच फिरकले नाहीत.

प्रश्‍‍नांची उत्तरे द्या

शंकर नाईक म्हणाले की, सरकार ‘सरकार (Government) तुमच्या दारी’ कार्यक्रम राबवते, हिंमत असेल तर सरकारने वाळपईत आणि मेळावलीत हा कार्यक्रम राबवावा आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शुभम शिवोलकर म्हणाले, काल झेंडावंदन होते तिथेसुद्धा काही पंचांनी उपस्थिती लावली नाही. यावरून कळून चुकते की, निवडून दिलेल्या माणसांना देशाबद्दल किती प्रेम आहे हे लक्षात येते. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी प्रितेश नाईक यांनीही विचार मांडले.

महिलांचाही लक्षणीय सहभाग

सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात नागरीक पंचायत कार्यालयाकडे जमले होते. यात महिलांचाही (Women) सहभाग होता. यावेळी शशिकांत सावर्डेकर म्हणाले की, आम्ही जे आमचे प्रश्न पंचायतीला सादर केले आहेत, त्यांची जोपर्यंत आम्हाला उत्तरे मिळत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. आयआयटीचे आंदोलन आम्ही नऊ महिने चालवले, आता पुन्‍हा आंदोलन सुरू करत आहोत. तसेच युवा वर्गावर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केल्‍यामुळे आधीच ग्रामस्‍थांत असंतोष आहे. त्‍यात आयआयटी प्रश्‍‍नांना बगल देत असल्‍याने वादाची ठिणगी पडली आहे. उद्यापासून आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT