Guirim Bardez Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: डोळे पाणावले! रस्ता ओलांडताना भरधाव जीप धडकली, 77 वर्षीय वृद्ध पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू Watch Video

Guirim Bardez Accident: गिरी, बार्देश येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. २४) रात्री घडलेल्या भीषण अपघातात आनंद धारवाडकर (७७, रा. म्हापसा) या वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : गिरी, बार्देश येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. २४) रात्री घडलेल्या भीषण अपघातात आनंद धारवाडकर (७७, रा. म्हापसा) या वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना जनरेटरवाहू जीपने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

उपलब्ध माहितीनुसार, आनंद धारवाडकर हे म्हापशाहून गिरीच्या दिशेने दुचाकीने जात होते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी वाहन बाजूला लावून रस्ता ओलांडून पेट्रोल आणण्यासाठी गेले होते. पेट्रोल घेऊन परतताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना भरधाव वेगात येणाऱ्या जनरेटरवाहू जीपने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले असून जागीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातस्थळी रस्त्यावर पथदीप नसल्याने अंधार पसरलेला होता. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या जीपचे दिवेही बंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे धारवाडकर यांना जीप दिसली नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आनंद धारवाडकर हे म्हापसा येथील एका पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

Goan Sweet Dishes: 'कुछ मिठा हो जाए' म्हणलं की डोळ्यासमोर कॅडबरी न येता धोंडस, तवसळी, पायस, मणगणे यायला हवेत..

Abhishek Sharma: अभिषेक शर्मा बनणार नवा 'सिक्सर किंग'! 'हिटमॅन'चा मोठा विक्रम धोक्यात, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Goa Opinion: पंचायती राज! राजकीय सत्तेचे केंद्रीकरण की विकेंद्रीकरण?

Portuguese Goa History: 1895 साली दादा राणेंनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं; आफ्रिकेत पोहोचले गोव्यातले सच्चे मराठे सैनिक

SCROLL FOR NEXT