सुत्र सप्तक" सुत्रसंचालन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सात आघाडीच्या सुत्रसंचालकांचे एकाच मंचावरुन मार्गदर्शन

सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला गोव्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र, मंगळुर, कोचिन, कारवार येथील हजारो कोकणी भाषिकांनी व सुत्रसंचालनात गोडी व आवड बाळगणाऱ्यांनी फेसबुक व युट्युब माध्यमांतुन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : पलाश अग्नी स्टुडिओजने (Studio) नित्यानंत क्रिएशन्ज व थींक एण्ड इंकच्या (Think and Inc) सहकार्याने आयोजित "सुत्र सप्तक" या सुत्रसंचालनवर आधारीत ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फुर्त व अभूतपुर्व असा प्रतिसाद लाभला. गोव्यातील अनुभवी व आघाडीचे सुत्रसंचालक डॉ. अजय वैद्य, डॉ पुर्णानंद च्यारी, संगीता अभ्यंकर, डॉ. रुपा च्यारी, पंकज नमशीकर, प्रा. गोविंद भगत व अनंत अग्नी  यांनी सुत्रसंचालन संदर्भातील अनेक मूलभूत व महत्वाच्या विषयांवर आपले विचार व अनुभव व्यक्त केले. सलग सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला गोव्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र, मंगळुर, कोचिन, कारवार येथील हजारो कोकणी भाषिकांनी व सुत्रसंचालनात गोडी व आवड बाळगणाऱ्यांनी  फेसबुक व युट्युब माध्यमांतुन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

डॉ. अजय वैद्य यांनी आवाज शैलीवर आपले विचार मांडले. सुत्रसंचालकासाठी शब्द उच्चारणीसाठी बाराख़डी व व्यंजनांचा नित्यनेमाने उच्चारण करावे असे सुचविले. डॉ. पुर्णानंद च्यारी यांनी सु्त्रसंचालक हा कलाकार असतो व आपले भाषेवरील प्रभुत्व या विषयाबद्दल सांगितले. वाक्चातुर्यावर आधारीत अनेक व्यवसायांबद्दलची माहिती संगीता अभ्यंकर यांनी दिली. सामाजीक, सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना कोणती पथ्ये पाळावी याची सविस्तर माहिती दिली. डॉ. रुपाच्यारी यांनी सुत्रसंचालनातील आपले बरे वाईट अनुभव कथन केले. कुठल्याही परिस्थितीत सुत्रसंचालकाने धीरगंभीर रहावे व आपला आत्मविश्र्वास तिळमात्र गमावू नये असे स्पष्ट केले.

सुत्रसंचालनाची पुर्वतयारी करताना स्वताची ओळख, ताकद जाणणे गरजेचे असल्याचे प्रा. गोविंद भगत यांनी सांगितले. सुत्रसंचालनात चुकीला जागा नाही असेही ते म्हणाले. रंगमंचावर येण्यापुर्वीच सुत्रसंचालकाने पूर्व तयारी करावी. त्यासाठी आयोजकांकडून कार्यक्रमाची संपुर्ण माहिती जाणून घ्यावी, संस्थेची माहिती, कार्यक्रमाचा उद्देश, कार्यक्रमाची रुपरेषा, संपर्कासाठीचा आयोजकांचा एक प्रतिनिधीची निवड, पेहराव, कार्यक्रमांतील वक्त्यांची माहिती जाणुन घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या मालिकेचे समारोपाचे सातवे पुष्प सुत्रसंचालनात 25 वर्षे पुर्ण केलेल्या अनंत अग्नी यांनी गुंफले. रंगमंच व्यवस्थापनाचे महत्व व ते कसे करावे यावर अग्नी यांनी चांगल्या पद्धतीने प्रकाश पाडला.

स्वतामधील कमजोऱ्या नष्ट करण्यासाठी सातत्य, सुदारणा, आत्मविश्र्वास, प्रसंगावधान, आनंदी मुद्रा, चेहऱ्यावरील हावभाव, चलाखी, हुषारपणा हे घटक महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अक्समात येणाऱ्या अडचणींना व प्रसंगांना कसे निभावुन नेताता यावरुन सुत्रसंचालकाची परिपक्वता सिद्ध होत असते असेही अग्नी यांनी सांगितले. शिवाय प्रेक्षक वर्गाचा अभ्यास करणे, आपले निवेदन थोडक्यात पण त्याचबरोबर माहितीपुर्ण कसे असावे हेपण महत्वाचे असल्याचे अग्नी यांनी सांगितले. शिवाय सुत्रसंचालकाने कुठल्याही कार्यक्रमाची स्वताचे हस्तलिखित तयार करणे तेवढेच महत्वाचे असल्याचेही अग्नी यांनी सांगितले.प्रत्येक दिवशी कार्यक्रमाचे संयोजन पुर्वा गुडे, पलाश अग्नी, अनीश अग्नी, वैदही झारापकर, युगा घोटगे व अन्वेषा सिंगबाळ  यांनी केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT