'गो गोवा गॉन' ला 8 वर्षे पूर्ण; कुणाल खेमूने क्लिपिंग्ज शेयर करत मानले आभार

कुणाल खेमू.jpg
कुणाल खेमू.jpg
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू  (Kunal Khemu) आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) चित्रपट गो गोवा गॉन (Go Goa Gone) हा चित्रपट रिलीज होऊन 8 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त कुणालने याबाबत एक बीटीएस व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तो कॅप्शन लिहिले की, गो गोवा गॉन ला 8 वर्षे झाली आहेत. जेव्हा जेव्हा मला हे क्षण आठवतात किंवा दिसतात तेव्हा मी खूप हसतो. हे इतके प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा झोम्बी फिल्म रिलीज होऊन आठ वर्षे झाली आहेत, असे त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. (Go Goa Gone completes 8 years today; Kunal Khemu thanked the audience) 

कुणाल खेमूचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. तसेच बॉलिवूडचे अनेक कलाकार कमेंट करून आपला अभिप्राय देत आहेत. अभिनेत्री लारीसा बोंसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.'व्वा 8 वर्षे! वेळ अशी उडून जाते... धन्यवाद! "अभिनेता पुलकित सम्राटने देखील प्रतिक्रिया देत लिहिले आहे,"की हा चित्रपट  सिक्वेलला पात्र आहे! आम्हाला या किक स्टाफची खूप गरज आहे.’’ विशेष म्हणजे प्रेक्षकही या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाविषयी माहिती विचारत आहेत आणि चित्रपटाचा पुढील भाग कधी प्रसिद्ध होईल याबद्दल भाष्य करीत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये चित्रपट निर्मात्यांनी गो गोवा गॉन च्या दुसराय भाग मार्च 2021 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोरोनामुळे चित्रपटांचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे. गो गोवा गॉन च्या पहिल्या भागावर प्रेम करणारे चाहते भाग 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या पुढील भागबद्दल आवर्जून विचारत आहेत. गो गोवा गॉन राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलं होता. यात सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला. चित्रपटाची जाहिरात भारताचा पहिला झोम्बी कॉमेडी फिल्म म्हणून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com