Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळावरील GTDC काउंटर सुरू; टॅक्सी व्यावसायिकांकडून आरोलकरांचा सत्कार

Mopa Taxi Service: मोपा विमानतळावरील गोवा पर्यटन विकास महामंडळाचा टॅक्सी काउंटर १ एप्रिलपासून ८ दिवस बंद होता. त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोपा विमानतळावरील गोवा पर्यटन विकास महामंडळाचा टॅक्सी काउंटर १ एप्रिलपासून ८ दिवस बंद होता. त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती. आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यापुढे कैफियत मांडली.

त्यानंतर आमदार आरोलकर,आर्लेकर यांच्या प्रयत्नांनी सरकारने हा विषय सोडवला. त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्या धारगळ येथील कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला, तसेच त्यांचे आभार मानले.

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, आपणही या पेडणे भूमीतले आहोत. पेडणे भूमीतील अनेक नागरिकांचे अनेक प्रश्न व्यावसायिक संबंधी असतील ते सोडवण्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे.

या व्यावसायिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशीही चर्चा केली. त्यांनीही सरकार दरबारी प्रयत्न केले. आणि दोन्ही आमदारांनी प्रयत्न केल्यामुळे हा विषय कायमचा सुटलेला आहे. ही गौरव करण्याची वेळ नाही. आपण आपले कर्तव्य केल्याचे आरोलकर म्हणाले. यावेळी टॅक्सी व्यावसायिकांनी जल्लोषाने आमदार जीत आरोलकर यांचा विजय असो असे नारे देऊन हा परिसर दुमदुमून सोडला होता.

टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले,की आमदार जीत आरोलकर यांनी तातडीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे चर्चा करून आमचा विषय तातडीने सोडवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT