Margao Parking Project Dainik Gomantak
गोवा

Margao Parking Project: मडगावातील पार्किंग प्रकल्पाला चालना

GSUDA Tender: जीसुडाने या प्रकल्पासाठी ८.३ कोटी रुपयांची निविदा केली जारी

गोमन्तक डिजिटल टीम

अखेर मडगावच्या बहुस्तरीय पार्किंग प्रकल्पाला चालना मिळण्याचे संकेत द गोवा राज्य नागरी विकास एजन्सी (जीसुडा) ने दिले आहेत. नगरपालिका इमारतीच्या मागे असलेल्या जागेतील मडगाव नगरपालिकेचा हा प्रकल्प गेली कित्येक वर्षे रखडत होता.

त्यानंतर हा प्रकल्प जीसुडाकडे सोपविण्यात आला. जीसुडाने आता या प्रकल्पासाठी ८.३ कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.

मडगावमध्ये होत असलेला वाहतुकीचा खोळंबा, पार्किंगसाठी अपुरी पडत असलेली जागा या सर्व समस्या लक्षात घेऊन हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे जीसुडाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

जीसुडातर्फे लवकरच त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. या बहुस्तरीय प्रकल्पात वाहने ठेवण्यासाठी चार मजले असतील. त्यात ७० चारचाकी व १२४ दुचाकी वाहने ठेवण्याची व्यवस्था असेल, असेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

वाद-विवादांत अडकलेला प्रकल्प

या प्रकल्पासाठी नगरपालिकेला सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने अनुदान २०११ साली मंजूर केले होते. २०१५ साली तेव्हाचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्यावरूनही वादंग उठले होते. मध्यंतरी या प्रकल्पात हॉटेलसाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना केली व त्यावरून मोठा वाद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT