training sessions for ground staff at MIA Dainik Gomantak
गोवा

कामाच्या ठिकाणी दिव्यांगजनांचा आत्मसन्मान जपा: गुरुप्रसाद पावसकर

दिव्यांगजन आयोगाकडून मोपा विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

दैनिक गोमन्तक डिजिटल

प्रवास सुलभ व सुकर होण्यासाठी विमान उड्डाण करण्यापूर्वी तसेच विमान उतरण्यापूर्वी द्यावयाच्या सेवांचा दर्जा व व्यापकता या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे दिव्यांगजनांचा आत्मसन्मान जपणे तसेच प्रवासासाठी त्यांचे उपयुक्त सक्षमीकरण करणे यासाठी विमानतळावर कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास, प्रतिनिधीस योग्य शिक्षण-प्रशिक्षणातून योग्य कार्यसंस्कृतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक ठरते, असे दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.

कामाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यसेवा बजावत असताना दिव्यांगजनांप्रती योग्य दृष्टिकोनाचा अवलंब करण्याप्रती जाणीवनिर्मिती करण्यासाठी या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यात नव्यानेच सुरू झालेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिव्यांगजनांना सुलभ व सहज सेवा उपलब्ध व्हावेत यासाठी दिव्यांगजन आयोगाच्या वतीने विमानतळावरील 1500 कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण सुरू आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक, जीएमआरचे मानव संसाधन व विकास प्रमुख नितीश व्हिक्टर यांच्यासह प्रशिक्षक विशांत नागवेकर, महादेव सावंत, जमिला हासिक आणि प्रसाद जोशी यांची उपस्थिती होती.

दिव्यांगजनांप्रती सेवा देताना दृष्टिकोन आणि सामान्य वृत्ती कशाप्रकारे राखली जावी यावर भर देण्यात आला. विमानतळावर कार्यरत सर्व विमानसेवा कंपन्यांची कार्यालये तसेच विमानतळावरील विविध विभागांतील कर्मचारी अशा सर्वांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य आहे. प्रशिक्षण उपक्रमातील सत्रे ५० जणांच्या बॅचमध्ये असतील.

मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

या प्रशिक्षण उपक्रमासाठी विशांत नागवेकर (आर्थोपेडिक दिव्यांग व्यक्ती), महादेव सावंत (दृष्टिदोषयुक्त व्यक्ती), जमिला हासिक (अंधत्व असलेली व्यक्ती) आणि प्रसाद जोशी (श्रवणदोष असलेली व्यक्ती) हे मार्गदर्शन सत्रे घेणार आहेत.

त्याचबरोबर प्रशिक्षणार्थींना दिव्यांगजनांसमवेत संभाषण साधताना कशा प्रकारे संकेतभाषेचा अवलंब करावा याबाबत संकेतभाषा मार्गदर्शक जोसेफिना डिसोझा या मार्गदर्शन करणार आहेत. दर आठवड्यातील बुधवार आणि गुरुवार या दिवशी सत्रे आयोजित केली जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT