Pollution  Canva
गोवा

Pollution in Goa: राज्‍यासमोर मोठी समस्या! वाढत्या प्रदूषण पातळीचे आव्हान; नियंत्रण मंडळ राबवणार Clean Action Plan

Goa Pollution Control Board: शांत, सुंदर, निसर्गसंपन्‍न गोव्‍यात ध्‍वनी, वायू, जल प्रदूषण वाढत असून ते रोखण्‍याचे आव्‍हान उभे ठाकले आहे. राज्‍यासाठी ‘क्‍लिन ॲक्‍शन प्‍लॅन’ तयार करण्‍यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rising Challenge Of Pollution in Goa

पणजी: शांत, सुंदर, निसर्गसंपन्‍न गोव्‍यात ध्‍वनी, वायू, जल प्रदूषण वाढत असून ते रोखण्‍याचे आव्‍हान उभे ठाकले आहे. राज्‍यासाठी ‘क्‍लिन ॲक्‍शन प्‍लॅन’ तयार करण्‍यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. तो अस्‍तित्‍वात आल्‍यानंतर बरेच सकारात्‍मक बदल दिसतील, असा विश्‍‍वास मंडळाचे अध्‍यक्ष महेश पाटील यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्‍त केला.

गोव्‍यात प्रदूषणाची समस्‍या वाढते आहे, हे त्‍यांनी मान्‍य केले. जागतिक वातावरण बदलाचा गोव्‍यावर परिणाम जाणवत आहे. सध्‍या ऐन थंडीत पावसाची निर्माण झालेली शक्‍यता, जाणवणारा उष्‍मा ही त्‍याचीच लक्षणे आहेत.

त्‍यामुळे होणारे परिणाम गंभीर स्‍वरूपाचे असू शकतात. समुद्र पातळीतही किंचित वाढ झाली आहे. ‘एनआयओ’ने त्‍यासंदर्भात यंत्रणांना सूचितही केले आहे. भविष्‍यकालीन समस्‍या विचारात घेऊन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या सहकार्याने तंत्रज्ञानाचे साह्य घेण्‍यात येत आहे, ज्‍याद्वारे विविध प्रकारच्‍या प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल, असेही पाटील म्‍हणाले.

ऑनलाईन नॉईज मॉनिटरिंग

ध्‍वनिप्रदूषण रोखण्‍यासाठी ‘ऑनलाईन नॉईज मॉनिटरिंग स्‍टेशन्‍स’ निर्माण केली आहेत. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्‍ली यांच्‍या वतीने अभ्यास करून सर्वेक्षण केले आहे. त्‍याआधारे प्रत्‍येक खात्‍याला ध्‍वनिप्रदूषण रोखण्‍यासाठी जबाबदारी दिली आहे. त्‍याची अंमलबजावणी सुरू होईल.

हॉटेल्‍ससाठी ‘ग्रीन रेटिंग’

राज्‍यात टुरिस्‍ट वाढत आहेत. त्‍या अनुषंगाने हॉटेल्‍ससाठी ‘ग्रीन रेटिंग’ ही संकल्‍पना निर्माण केली आहे. त्‍या अंतर्गत निकष ठरवण्‍यात आले आहेत. प्‍लास्‍टिकचा वापर टाळून सोलर वीज वापराला चालना देण्‍यात येते. ग्रीन रेटिंग मिळालेल्‍या हॉटेल्‍सची संख्‍या आणि त्‍यासोबत गुडविल तयार होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Esakal No 1: 19.5 दशलक्ष युजर्सचं प्रेम! डिजिटल जगात 'सकाळ'च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोहोर

Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

SCROLL FOR NEXT