While protesting BJP by showing black flags Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa : काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; अमित पाटकर संतप्त

भाजपच्या कृत्याचा काँग्रेसकडून निषेध

दैनिक गोमन्तक डिजिटल

Amit Shah In Goa: भाजपने कर्नाटकात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी म्हादईच्या केलेल्या ‘कराराचा’ निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते केवळ काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्यावर त्यापूर्वीच कारवाई करण्यात आली, भाजप सरकारने केलेल्या कृत्याचा काँग्रेसने निषेध केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोंडा येथील सभेपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांना नजरकैदेत ठेवले गेले.

गोवा काँग्रेस प्रदेश समिती अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, संपूर्ण सरकारी यंत्रणा आमच्या विरोधात वापरली गेली. आम्ही फोंड्यात पोहचण्यापूर्वीच आम्हाला वाटेवर अडवून ताब्यात घेण्यात आले.

आम्ही फक्त अमित शहा आणि भाजप नेत्यांकडून म्हादईच्या मुद्यावरून स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी निघालो होतो. आम्हाला शहा यांनी आमची म्हादई कर्नाटकला विकली आहे का? हेच जाणून घ्यायचे होते.

अमरनाथ पणजीकर म्हणाले, काँग्रेस नेते केवळ म्हादईच्या मुद्यावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण मागून निषेध करण्याचा प्रयत्न करत होते. गोवा सरकार आणि पोलिसांच्या कृतीने भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे.

पोलिस सकाळपासून माझ्या मागावर होते. मी जुने गोवे येथे माझ्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. पोलिसांनी मला नजरकैदेत ठेवल्याचे ते म्हणाले.

दबावतंत्राला न घाबरता निदर्शने

माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आदींनी म्हादईप्रश्नी अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे या मागणीसाठी फोंडा येथे निदर्शने केली. याप्रसंगी विरेंद्र शिरोडकर, विजय भिके, ज्योएल आंद्रादे, नौशाद चौधरी, राजेश वेरेकर आणि इतर नेते उपस्थित होते.

भाजपच्या दबावतंत्राला न घाबरता कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले. काँग्रेसने गोव्यात सत्ता असताना कधीही अशा हुकूमशाही पद्धतीचा वापर केला नाही आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही केला नसल्याचेही ते म्हणाले.

"म्हादईबाबत ज्यांनी तडजोड केली, त्यांचे गोव्यातील भाजप नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. हा म्हादईला आपली आई जीवनदायिनी म्हणणाऱ्यांचा अपमान आहे."

- गिरीश चोडणकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT