Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरणार पंधरवड्यात!

अमित पाटकर : मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत निर्णय

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठरणार आहे. त्यासाठी गोव्यात 11 किंवा 12 रोजी पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक गोव्यात येणार आहेत. सर्व आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर ते त्या नेत्याचे नाव जाहीर करतील, अशी माहिती दिल्लीवरून परतलेले प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

(group leader of the Congress party in a fortnight)

पाटकर हे रविवारी रात्री उशिरा दिल्लीतील बैठकीतून गोव्यात परतले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजनाविषयी दिल्लीतील बैठकीसाठी ते गेले होते. या दौऱ्यात राज्यातील विरोधी पक्षनेता निवडीवर चर्चा झाली की नाही, याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, यावर तेथे काही चर्चा झालेली नाही.

येत्या सात रोजी देशात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्या बैठकीविषयी राज्यातील तयारीविषयी दिग्विजय सिंग यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नियोजन कशा पद्धतीने असावे, याविषयीही याप्रसंगी मते जाणून घेण्यात आली, असे पाटकर यांनी सांगितले. दिल्लीत सरचिटणीस मुकुल वासनिक यांची भेट झाली नाही; परंतु ते 11 किंवा 12 सप्टेंबर रोजी गोव्यात येतील. त्यानंतर ते सर्व आमदारांची मते जाणून घेऊनच विरोधी पक्षनेता ठरविला जाईल, असे ते म्हणाले.

युरी आलेमाव आघाडीवर, तरीही...

विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यासाठी सध्या कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु आमदार संकल्प आमोणकर आणि कार्लुस फेरैरा यांची नावे शर्यतीत असली तरी त्यांच्या नावासाठी पक्षातील इतर नेत्यांचे मत काय आहे, हेही महत्त्वाचे आहे.

सभापतींच्या निर्णयाकडे लक्ष : तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद मायकल लोबो यांच्याकडे आहे. परंतु त्यांना व आमदार दिगंबर कामत यांना अपात्र ठरवावे म्हणून पाटकर यांनी सभापतींकडे अर्जही दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु बरेच पाणी पुलाखालून गेल्याने लोबो व कामत पक्षाच्या कार्यक्रमांना हजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे पाटकर यांच्या अर्जावर खरोखरच तवडकर काय निर्णय देतात, याकडे पक्षातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT