Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: मांगोरहिल येथे भू-गटार वाहिन्यांच्या कामाला शुभारंभ

नागरिकांच्या अनेक वर्षांच्या गैरसोयी दूर होणार -आ. साळकर

गोमन्तक डिजिटल टीम

कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कोळसा भरला जातो, हे वास्कोवासियांनी पाहिले आहे. त्यामुळे सालसेत ट्रकमालक संघटनेने केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही. आपणास त्या संघटनेच्या अध्यक्षाच्या दाव्यावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले. मांगोरहिल येथे भू-गटार वाहिन्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मांगोरहिल येथे भू-गटार वाहिन्या घालण्याच्या कामाचा प्रारंभ आमदार साळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सतीश च्यारी, प्रशांत नार्वेकर, सिद्धार्थ कासकर वगैरे उपस्थित होते. मांगोरहिलच्या चार ठिकाणी या वाहिन्या घालण्यात येतील. जुन्या वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. मायमोळे, मेस्तावाडा वगैरे ठिकाणी लवकरच भू-गटार वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात येईल. त्यादृष्टीने काही ठिकाणी भू-संपादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रकांची माल वाहून नेण्याची जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा अधिक माल वाहून नेण्यात येत असल्याचा पुनरुधार त्यांनी केला. ट्रकांच्या हौद पातळीपेक्षा अधिक उंचीवर कोळसा भरला जातो. त्यावर ताडपत्री घालण्यात येते. मात्र, हौद पातळीपेक्षा अधिक कोळसा भरण्यात आल्याने कोळशाची भुकटी, कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडून प्रदूषण होते.

मुरगाव बंदर प्राधिकरण व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोळसा प्रदूषण होऊ नये, यासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे ट्रकमालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय सरकारी यंत्रणेने जागे होण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT