Air Pollution: कारखान्यातील धूराने त्रासलेल्या नागरिकांनी कारखानाच पाडला बंद

मुस्लिमवाडा-डिचोली येथे कार्यरत असलेल्या 'ऑरेंज स्टील इस्पात'' कारखान्यातील धूर प्रदूषणाने त्रस्त झालेले परिसरातील नागरिक अखेर एकवटले आहेत.
factory |Air Pollution
factory |Air PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Air Pollution: मुस्लिमवाडा-डिचोली येथे कार्यरत असलेल्या 'ऑरेंज स्टील इस्पात'' कारखान्यातील धूर प्रदूषणाने त्रस्त बनलेले परिसरातील नागरिक अखेर एकवटले आहेत. संतप्त नागरिकांनी आज (शनिवारी) रस्त्यावर उतरून संबंधित कारखान्यातील कामकाज बंद पाडले. प्रदूषणाची ही समस्या सुटली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या नागरिकांनी दिला आहे.

मुस्लिमवाडा परिसरात कार्यरत असलेला पूर्वाश्रमीचा 'गोवा स्टील रोलिंग मिल' आणि सध्याच्या 'ऑरेंज इस्पात स्टील' या स्टील उत्पादन करणाऱ्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर प्रदूषण होत असल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.

या प्रदूषणाबाबत कंपनी व्यवस्थापनाला कळवूनही कोणतीच उपाययोजना करण्याची पावले उचलण्यात येत नसल्याने अखेर संतप्त बनलेल्या महिला मिळून सुमारे शंभर लोक अचानक रस्त्यावर उतरले.

आम्हाला प्रदूषणापासून मुक्ती द्या, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी कारखान्यावर धडक देऊन कामकाज बंद पाडले.

factory |Air Pollution
Venus-Saturn closing: अवकाशात आज शुक्र-शनिचा अनोखा संयोग; गोव्यातही मोफत पाहता येणार, वाचा सविस्तर

आंदोलकांत नगरसेवक रियाज बेग, माजी नगरसेवक निसार शेख, वितेंद्र गोवेकर, कृष्णकांत डिचोलकर आदींचा समावेश होता. आंदोलनावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

आंदोलनाची माहिती मिळताच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्या लोकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपण लोकांच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

factory |Air Pollution
Illegal Boating: ‘ती’ बोट गोव्‍याच्‍या हद्दीत आलीच कशी?

उद्या होणार पाहणी

आमदार डॉ. शेट्ये यांनी त्वरीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रदूषणाबाबत चर्चा केली.आमदारांच्या आदेशानुसार येत्या सोमवारी (ता.23) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यातील कामकाज आणि निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यात येणार आहे,अशी माहिती मिळाली आहे.

घातक धुराचा दहा वर्षांपासून सामना !

संबंधित कारखान्यातील चिमणीतून निघणारा प्रदूषणकारी धूर सर्वत्र पसरत असतो. साधारण तीन किमी क्षेत्रात या धुराचा परिणाम जाणवत आहे. धुरामुळे परिसरातील रस्त्यांसह वाहने, घरेही काळवंडली आहेत.

हा प्रदूषणकारी धूर आरोग्यासही घातक असल्याची आंदोलकांची तक्रार आहे. गेल्या दहाहून अधिक वर्षांपासून धूर प्रदूषणामुळे आम्ही अनेक समस्या आणि संकटांशी सामना करीत आहोत. मात्र त्याचे कंपनी व्यवस्थापनाला काहीच सोयरसुतक नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com