Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: हुंड्यात दिली नाही BMW कार! डॉक्टर बायकोला गोवा विमानतळावर सोडून नवरा फरार, दागिनेही केले लंपास

नवरीच्या पालकांनी मोठा खर्च करत गोव्यातील एका महागड्या हॉटेलमध्ये त्यांचा विवाह लावून दिला होता.

Pramod Yadav

Goa: लग्नात हुंडा म्हणून 25 लाख रुपये घेऊनही बीएमडब्ल्यू कारची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नानंतर बायकोला गोवा विमानतळावर सोडून नवरा फरार झाला. एवढेच नव्हे तर त्याने दागिन्यांने भरलेली बॅगही लंपास केली आहे.

नवरीच्या पालकांनी मोठा खर्च करत गोव्यातील एका महागड्या हॉटेलमध्ये त्यांचा विवाह लावून दिला होता. विशेष म्हणजे फरीदाबाद, हरियाणा येथील रहिवाशी असणारी नवरी मुलगी पेशाने डॉक्टर आहे. दरम्यान, याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नवरी मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी तिचा बायोडेटा मॅट्रिमोनिअल साइटवर टाकला होता. बायोडेटा पाहून हिसार येथील रहिवासी डॉ. अबीर कार्तिकेय गुप्ता यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडिलांशी बोलणी केली. अबीरची आई आभा गुप्ता आणि वडील अरविंद गुप्ता हे देखील डॉक्टर आहेत. हिसारमध्ये त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे.

नेपाळ विद्यापीठातून ईएनटीची स्पेशॅलिटी करत आहे. लग्नाची बोलणी पुढे सरकली आणि त्यानंतर 26 जानेवारी 2023 ही लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाआधी अबीरच्या आई-वडिलांनी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पीडितेच्या वडिलांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली.

लग्न ठरल्यानंतर गोव्यातील एका महागड्या हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले, ज्याचा सर्व खर्च मुलीच्या वडिलांनी उचलला. लग्नाचे फेरे झाल्यानंतर अबीरच्या आई-वडिलांनी बीएमडब्ल्यू कारची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण झाली तरच वधूला सोबत नेऊ, असे त्यांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांनी विनंती करून मुलीला निरोप दिला.

दरम्यान, गोवा विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग केल्यानंतर अबीरने नवरी मुलीला थोड्या वेळाने येतो असे सांगून एकटीला सोडून पळ काढला. यानंतर मुलाने मोबाईल बंद केला. अबीरची आई डॉ. आभा गुप्ता यांनीही पीडित मुलीकडून दागिन्यांनी भरलेली बॅग काढून घेतली. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर विमानतळावर पोहोचून तिला सोबत घेऊन आले.

विवाहापूर्वी अबीरने तिला वारंवार नेपाळला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप नवरी मुलीने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT