Joggers Park goa Dainik Gomantak
गोवा

चिखलीत हिरवळ सुकली, करमणुकीची साधनेही मोडली

जॉगर्स पार्कची दुरावस्था: निधीअभावी अडली देखभालीची कामे

दैनिक गोमन्तक

वास्को: चिखलीतील जॉगर्स पार्कची देखभाल करण्यासाठी चिखली ग्रामपंचायतीकडे पुरेशा निधी उपलब्ध नसल्याने पंचायतीद्वारा देखभाल करणे अवघड बनले आहे. निधीअभावी जॉगर्स पार्कची देखभाल करण्यास पंचायत हतबल ठरत आहे, अशी माहिती चिखलीचे सरपंच सेबेस्तियानो परेरा यांनी दिली.

चिखलीमध्ये सुंदर व मोछा असा जॉगर्स पार्क आहे. या जागर्स पार्कचे उद्‍घाटन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्व. पर्रीकर यांनीही या पार्कच्या एकून रचनेबद्दल कौतुक केले होते. या पार्कमुळे आसपासच्या रहिवाशांची मोठी सोय झाली आहे. दाबोळी मतदारसंघातील एक भूषण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. परंतु सध्या पंचायतीकडे निधी नसल्याने जॉगर्स पार्कची देखभाल करणे शक्य होत नसल्याचे सरपंच परेरा म्हणाले.

जॉगर्स पार्कची देखभाल पूर्वी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ करीत होते. त्यानंतर या जॉगर्स पार्कचा ताबा चिखली पंचायतीकडे देण्यात आला. परंतु एवढ्या मोठ्या प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी चिखली पंचायतीकडे पुरेशा निधीच नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यःस्थितीत पाण्याअभावी या पार्कमधील हिरवळ, लहान रोपटी सुकली आहेत. करमणुकीच्या आसनांची व काही वस्तूंची मोडतोड झाल्याने दुरुस्तीची गरज बनली आहे. जॉगर्स पार्कमधील हिरवळ सुरक्षित राहण्यासाठी व इतर रोपट्यांसाठी प्रतिदिन दहा टॅंकर पाण्याची गरज आहे. परंतु सध्या केवळ आठवड्यातून एकदाच हिरवळ, रोपट्यांना पाणी देत असल्याचे सरपंच परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT