Viral Grandma Dance Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Viral Grandma Dance Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, परंतु काही व्हिडिओ असे असतात जे थेट काळजाला भिडतात.

Manish Jadhav

Viral Grandma Dance Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, परंतु यातील काही व्हिडिओ असे असतात जे थेट काळजाला भिडतात. सध्या असाच एक कोकणी गाण्यावर डान्स करणाऱ्या वृद्ध आजीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. इंटरनेटवर या आजीबाईंनी सर्वांची मने जिंकली आहेत. हा धमाकेदार व्हिडिओ गोव्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

एका लग्नात या आजींनी ज्या उत्साहात आणि आत्मविश्वासात डान्सा केला, जो पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. "या लग्नात नक्की कोणी रंग भरला? तर या रॉकस्टार आजींनी!" अशा शब्दांत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या आजी केवळ नाचल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या ऊर्जा आणि उत्साहाने तरुण पिढीलाही मागे टाकले आहे, म्हणूनच त्यांना 'शताब्दीतील रॉकस्टार' अशी पदवी नेटकऱ्यांनी बहाल केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये या आजींचा डान्सा करताना तोल आणि आत्मविश्वास पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने अतिशय मार्मिक निरीक्षण नोंदवले की, या आजींनी त्यांच्या तारुण्यात डोक्यावर जड टोपल्या किंवा पाण्याचे हंडे वाहून कष्टाचे काम केले असावे, म्हणूनच आज वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या शरीराचा तोल आणि डान्समधील (Dance) आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे. या सब-रेडिटवरील या वर्षातील हा सर्वात मजेशीर व्हिडिओ असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. आजींच्या चेहऱ्यावरील हास्य आणि पायांमधील थिरकन पाहून कोणाचेही मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्स पाहिल्या तर जाणवते की, आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात या आजींनी दिलेला आनंदाचा संदेश लोकांना किती भावला आहे. "यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही, या आजी प्रेम आणि आदरास पात्र आहेत," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा केवळ एक डान्स नसून आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे ते एक जिवंत उदाहरण ठरले आहे.

सोशल मीडियावरील (Social Media) नकारात्मकता बाजूला सारुन अशा प्रकारच्या व्हिडिओंनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. या 'आजींंनी दाखवून दिले की, वय हा केवळ एक आकडा असतो आणि जर मनात उत्साह असेल तर तुम्ही कोणत्याही वयात रॉकस्टार बनू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT